वेलींना आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी १
नष्ट करिल तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता २
वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या आधार पोकळ
स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल ३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply