गारेगार सावलीचा,
भला थोरला आधारवड.
पारंब्या झुलवत –
अलवार कुरवाळणारा.
मनसोक्त खेळलोय,
अंगाखांद्यावर त्याच्या.
गाढ झोपून गेलोय –
मांडीवर पाराच्या.
उन्हाळा पावसाळा थंडी –
सकाळ सायंकाळ,
मग्न व्रतस्थासारखा –
वावर तिन्हीत्रिकाळ.
मोठा झालोय खेळता खेळता,
त्याच्याच सावलीत,
तो सतत उभाय आम्हाला –
आवर्षणापासून वाचवित.
आधारवड आता थकलाय,
पानापानांतून सुकलाय.
मूळ कुडीतुनच पूर्ण –
वृद्धत्वाकडे झुकलाय.
निखळलेल्या पाराची आहे –
अजून त्याला साथ.
आधारवड जगतो आहे –
कोसळण्याची वाट पहात.
प्रासादिक म्हणे
— प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply