नवीन लेखन...

आहाररहस्य १३

मना सत्य संकल्प….स्वास्थ्य संकल्प जीवी धरावा….

आधी एक ठरवूया, किती वर्ष जगायचंय ?

आपली मानसिकताच इतकी बदलून गेली आहे, की कोणी शंभर वर्षासाठी जगायच्या शुभेच्छा दिल्या तर त्याही नको वाटतात.

“पुरे झाले मिळाले तेवढे आयुष्य.”
“कंटाळा आला.”
“काय करायचे आहे जगून.”
“नको रे बाबा, हे असलं जगणं.”
“आता काऽही शिल्लक राहिले नाही”
नकोत ती औषधे, नकोच ते जगणं”

असे अनेक उद्गार उद्विग्नतेतून सहजपणे बाहेर पडतात.
जगण्यावरचा विश्वास एवढा कमी का झाला ?
कारण आनंद निर्माण करणारी ठिकाणं कमी झाली.
जो जिथं आहे तिथं आनंद मिळत नाही, अशी नकारार्थी धारणा तयार झाली आहे.
ही धारणा मनातून कायम स्वरूपी जाण्यासाठी ठोस उपाय हवा आहे.

“जीवेत शरदः शतम” असा शंभर शरद ऋतु आनंदाने जग, असा आशीर्वाद मिळणार्‍या देशात एवढे नैराश्य?
ही मानसिकता एवढी का बदलली ?

लक्षात असे येत आहे, की दररोज जेवताना मनात एकच विचार असतो,
हा घास मी चुकीचा तर घेत नाही ना ?
याने माझे काही नुकसान तर होणार नाही ना ?
मी आहाराचा कोणता नियम चुकवत तर नाही ना ?
एवढे नियम पाळूनही ही दररोजची औषधे काही कमी होत नाहीत.
एवढी औषधे खायची तर जेवायचे तरी कशाला ?
मी एवढे नियम पाळतो, पण माझा काहीच फायदा होत नाहीये.

जेवता जेवता प्रत्येक घासाला, असा नकारार्थी विचार मनात आणत जेवले, तर कितीही पौष्टिक आणि सात्विक भोजन घेतलेत तरी काही फायदा होणार नाही. उलट तोटाच होईल.

असेच नियम पाळावेत, जे त्रिकालाबाधीत सत्यच आहेत.
त्रिकालाबाधीत म्हणजे आजच्या भाषेत “युनीव्हर्सली अॅक्सेप्टेड.” जगन्मान्य वैश्विक सत्य !!!

जगात कुठेही गेलात तरी ती कधीही बदलत नाहीत. आणि बदलणारही नाहीत.

काय आहेत ही सत्य ?
शोधण्याचा प्रयत्न करूया.
जसं, “जसा संकल्प तसे फळ” हा त्रिकालाबाधीत सत्य असलेला नियम आहे.

आहाराच्या माध्यमातून ही नकारार्थी संकल्पधारणा बदलवता येईल का ?
हो.
एकच करायचं. प्रत्येक घास खाताना मनात एकच विचार आणायचा….
” या मी सेवन करीत असलेल्या माझ्या आहाराचा हा घास, माझे आयुष्य निरोगी करायला, आणि औषधांशिवाय जगवायला मला मदत करीत आहे.

……..आणि बाहेरची औषधे घेताना संकल्प करावा, हे डाॅक्टरांचे औषध लवकरच बंद होत आहे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
03.09.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..