नवीन लेखन...

आहाररहस्य ४

सूत्रातील पुढील महत्वाचा मुद्दा आहे, प्रकृतीचा !
.
आहाराचा आणि प्रकृतीचा खूप जवळचा संबंध असतो.
वाताची प्रकृती असेल तर आहार पण वातासारखा. सारखाच अनिश्चित. वारा आला तर भडकून पेटेल. नाही आला तर नुसता धूर. अगदी तस्सेच.

अश्या वात प्रकृती वाल्यांनी आहारावर, आपल्या जीभेवर लक्ष आणि संयम ठेवला पाहिजे. जो पदार्थ काल खाल्ला तो पचला, पण आज तोच पदार्थ खाल्ला तर पचेल याची खात्री देता येत नाही.

नुसता वारा असून चालत नाही, कुठेतरी ठिणगीचं अस्तित्व असावे लागते, तरच ज्वाला तयार होतात. प्राकृत पित्त प्रकृति पचनाला मदतच करणारी असते. या प्रकृतीची खूप खाल्लेतरी पचवून परत खाण्याची शक्ती असते.पण अगदी खाखा सुटणे हे पित्त प्रकृती, विकृत झाल्याचे लक्षण असते.

कफ प्रकृतीमधे भूक स्थिर असते.त्यामुळे प्रमाणात खाल्लेतर पोषण नीट होते.
पण कफ विकृत झाला की आहार विषाप्रमाणे काम करतो. चरबी वाढवायला मदत करतो. अवयवांमधेच अपाचित आहार साठवून ठेवतो. त्यामुळे लंबोदर व्हायलाही मदत होते.

प्रकृतीच्या आणि विकृतीच्या या अवस्था वैद्याला समजतात. एखाद्या प्रकृतीचे रूपांतर विकृतीमधे कसे होत जाते, ही रेषा अगदी पुसट असते.

वरवर पाहिले तर कळत नाही, समजत नाही, शरीरात चालले आहे, ते प्राकृत चालले आहे, की विकृतीचे ?
यासाठीच समर्थानी सांगितले आहे,
अखंड सावधान असावे,
दुश्चित्त कदापि नसावे ।।

आपली प्रकृती ओळखून आहारात बदल घडवून आणणे महत्वाचे असते. बरं हा आहार, माझ्या प्रकृतीला योग्य होतोय की नाही, हे अनुमानाने आणि अनुभवानेच जाणून घ्यायचे असते. ते मोजण्यासाठी, वैद्याच्या सल्ल्याशिवाय वेगळी फूटपट्टी नाही.

किंवा स्वतःच फूटपट्टी व्हायचे आणि ठरवायचे, माझ्या शरीरात चालले आहे ते प्रकृतीनुसार की विकृतीनुसार.

आपले आयुष्य शंभर वर्षे गृहीत धरले आहे. आणि वैद्याकडे जावून मधेमधे आपली प्रकृती दाखवून यावी, ते प्रकृतीचे विकृतीमधे रूपांतरण होऊ नये यासाठीच !

आजकाल डाॅक्टरांकडे फक्त विकृती दाखवायला जातात. पण तोपर्यंत वेळ, काळ आणि प्रकृती आपल्या हातून निसटून गेलेली असतात. गरज पडू नये, (आपले स्वास्थ्य उत्तम रहावे यासाठी ) वेळीच आपले प्राकृत समजले तर विकृतीपर्यत वेळ येणार नाही.

सतत डाॅक्टरकडे जाणंही बरे नव्हे. गरजेपुरते त्याला म्हणजे वैद्याला आठवावे, नंतर विसरून जावे.
बाकी “त्याचा” विसर न व्हावा.

म्हणून म्हणतात ना,
तुझा विसर न व्हावा,
आणि
गरज सरो वैद्य मरो !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
15.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..