All world is like a home.
वसुधैव कुटुंबकम् ।।
यालाच हे विश्वची माझे घर असं माऊलींनी म्हटलंय.
जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला.
या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून द्यावी लागेल.
ज्याची मास्टरी ज्याच्यात, त्याला ती जबाबदारी द्यावी.
या अलिखित नियमानुसार अमेरीकेला बेडरूम, ब्राझीलला मास्टर बेडरूम, फ्रान्सला दिवाणखाना, ऑस्ट्रेलीयाला खेळायची खोली, इंग्लडला देवघेवीची खोली, वेस्टइंडीजला पडवी, जपान कोरीया संगणक कक्ष, चीनला लघुउद्योग कक्ष, डेन्मार्कला गोठा, स्वीत्झर्लंडला तिजोरीची खोली, दिली जाईल. दिली जावी.
या विश्वघरातील संडास बाथरूम कोणाकडे द्यायचे ?
हं.
आपले लंगोटीयार पाकिस्तान आहेच की ! त्याला देऊन टाकू.
देवघर आणि स्वयंपाकघर मात्र भारतमातेकडेच !
ज्याचा जैसा अधिकार होय…..
होयच मुळी.
भारताने जगाला या दोन गोष्टी दिल्या, देत आहे, देतच रहाणार.
देवघरात जन्माला आलेले अध्यात्म शास्त्र आणि स्वयंपाकघरात जन्माला आलेले आहारशास्त्र.
फक्त भारतातच !
या दोहोंची जननी भारतमाताच !!
या दोहोंची उत्पत्ती ही अत्यंत पवित्र आणि सात्विक वातावरणातच व्हायला हवी ना.
असे पोषक आणि पूरक वातावरण भारताशिवाय अन्य कोणत्या संस्कृतीमधे मिळेल ? सांगा बघू ?
सर्व संस्कृतींची जननी ठरलेले वेद वाञ्ड्मय हे भारतातीलच !
प्राचीन वैदिक भारताचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा,
“आताची परिस्थिती काय आहे ती पहा, ऊगाच पुराणाचे गोडवे गायची आवश्यकता नाही.”
असा सूर ऐकू येतो.
मग वाद येऊन थांबतो तो विज्ञानाची प्रगती आणि भारताची अधोगती यावर…..
याला जबाबदार कोण ?
भारतीय संस्कृति की राजकीय विकृती ?
वेदामधील विज्ञान की संशोधनातील अनास्था ?
प्राचीन गुरूकुल शिक्षण पद्धत की आजचे शैक्षणिक धोरण ?
हे प्रश्न न संपणारे आहेत.
गरज आहे ती व्यवहाराला आणि सत्याला सामोरे जाण्याची.
ज्याची जशी दृष्टी, तशी उत्तरे सापडत जातील.
पण, ज्यांनी इतिहासाकडे (भूतकाळाकडे) दुर्लक्ष केले, त्यांचे भविष्य संपले, हे वर्तमान विसरून कसे चालेल.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
29.08.2016
Leave a Reply