नवीन लेखन...

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७१

आहारातील बदल आपण किती मान्य करायचे किती अमान्य करायचे, किती बदलांना अंगवळणी पाडायचे, कितींकडे दुर्लक्ष करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण
केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे पहाणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

जनावरांना काय खावे, काय खाऊ नये, याची उपजत बुद्धी असते. विषारी पाला जनावरे खात नाहीत. त्यांना जेवढे पचेल तेवढेच ते खातात.

अन्न कोणते खावे, काय संस्कार करून खावे, याविषयी माणूस अनभिज्ञ आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्या परीक्षा करून त्याला अन्नातील भेसळ ओळखण्याची शक्ती खूप कमी आहे. यासाठी त्याने माणसाला बुद्धी दिली आहे.

आयुर्वेदाने प्रत्येक पदार्थाचे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर काय परिणाम होतात, हे स्पष्टपणे सांगितलेले आहे. ज्या काळी ग्रंथांची रचना केली, त्या काळी मिळत नसलेले काही पदार्थ आज उपलब्ध आहेत. या पदार्थांचे गुण आणि दोष कसे ओळखावेत, याच्या काही कसोट्या ग्रंथात वर्णन करून ठेवल्या आहेत.

या प्रत्येक बदलाचा अभ्यास करून आजची वैद्य मंडळी प्रत्येकाची प्रकृती, वय, ऋतु, पचनशक्ती, प्रदेश, मन इ. चा विचार करून प्रत्येकाचे योग्य पथ्यापथ्य सांगत असतात, पण औषधापुरता वैद्य हवा. नंतर स्वतःची मनमानी सुरू. त्यामुळे स्वतःच ठरवून, आपल्या प्रकृतीला न मानवणारे सुद्धा, हव्वे ते खाणार. याला आयुर्वेद ” प्रज्ञापराध ” असा शब्द वापरतो. आणि समर्थ रामदास स्वामी पढतमूर्ख म्हणतात. आणि हेच सर्व रोगांचे मूळ आहे.

पूर्वी सणांचा आणि ऋतुंचा विचार करून घरात अन्नपदार्थ किंवा पक्वान्न बनवले जात होते. होळीला पुरणपोळी, गुढीपाडवा म्हणजे श्रीखंड, लग्नकार्य असले की लाडू, दिवाळीला चिवडा चकली, गृहप्रवेश वास्तुशांत, बारसा असला तर गोडधोड, पाहुणे आले तर पक्वान्न.
आज हे सर्व बदलले आहे. बाजारात केव्हाही जावा, पानस्टाॅलवर सुद्धा शेव चकली चिवडा मिळतोय. पाव, पाणीपुरी, इ. पदार्थ बनवतानाची स्वच्छता आपण सर्व जाणताच.

कृत्रिम चवी, चटकमटक, वेळी अवेळी खाणे, कमीत कमी श्रमात आणि कमीत कमी वेळेत तयार होणारे पदार्थ, शिळे अन्न, परान्न ही सर्व रोगाची कारणे आहेत.

पण लक्षात घेतो कोण ?
जमाने के साथ चलो, असं उलट वैद्यांनाच सुनावतात. नव्या युगातील सोईस्कर बदल यांना हवे असतात. पण स्वतः मात्र बदलाला तयार नसतात. म्हणूनच म्हटलं, सगळंच बदलंलय.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
03.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..