नवीन लेखन...

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

अस्सल भारतीय बैठकीची पंगत बदलली.

जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे.

आज सर्व घरांमधे, हाॅटेलप्रमाणेच काटकोनात बसून अन्न ग्रहण केले जाते. खाली बसणे ज्यांच्या सिलॅबसमधेच नाही, ते डाॅक्टर देखील सांगतात, खाली बसूच नका. जेवायला पण नको, मलविसर्जनाला पण नको.!!!

हा विषय पूर्वीच्या एका आरोग्य टीपेत आलाय.

गेले, बदलले सारे…

उकीडवे बसून जेवणे आणि उकीडवे बसून मलविसर्जन करणे यावर आता शास्त्रीय अभ्यास जर्मनी रशिया सारख्या देशात सुरू आहे.

खाली बसणे म्हणजे उकीरड्यावर बसल्याप्रमाणे ज्यांना वाटते, त्या पाश्चात्य बुद्धीला काय म्हणावे ?

स्वत्व विसरलो, की असे होते.

महत्वाचे म्हणजे पंगत.
घरातील सर्वांनी एकत्र बसून जेवणे. छान आनंदाने सहभोजन केले की मन प्रसन्न राहातेच. उदबत्ती लावून रांगोळी घालून, श्लोक म्हणून, ज्याने अन्न दिले, त्या शेतकऱ्याला शुभेच्छा देत आणि देवाला नमस्कार करून जेवायला सुरवात करावी.

एकत्र बसून जेवल्याने एकमेकांच्या आवडीनिवडींविषयी जागरूक राहून अन्न वाढता येते.

बदललं सारं…..

सार्वजनिक ठिकाणी बुफे पद्धत आली, पंगत संपली आणि फिरत फिरत खायची पद्धत सुरू झाली. आणि आता घरात सुद्धा हे सुरू झालंय. जो तो येतो, आपल्याला हवं ते घेतो, हवं तिथं जाऊन बसतो.

कोणी टीव्ही समोर, कोणी मोबाईलवर बोलत, कोणी लॅपटॉप घेऊन बसलेला, कोणी गुपचुप चॅटींग करत एकतर फेसबुक नाहीतर वाॅटसप.

याला काय सहभोजन म्हणायचं ?
बदललं ना सगळं !

आपल्या हातानी घेणे आणि आग्रह करून प्रेमाने वाढणे, यात फरक पडतोच ना. वाढणारा किंवा वाढणारी आपल्या घरातील, प्रेमाची असेल तर दूध मे शक्कर.

अहो, साधे डोके दुखत असेल तर अमृतांजन जरा चोळले तरी बरे वाटते. पण डोक्यावरून हात फिरवणारं कुणी असेल तर मग, अमृतांजनाची पण गरज वाटत नाही. तसंच आहे.

डोळे पुसणारं कुणी असेल तर रडण्याला अर्थ आहे नाहीतर सारं जीवन व्यर्थ आहे.
तसंच वेळेत, प्रेमानं वाढणारं कुणी असेल तर जेवणाला अर्थ आहे, नाहीतर जेवून सुद्धा सारं जेवण व्यर्थ आहे.

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
05.12.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..