नैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय.
छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ?
वेळच नाही हो.
आम्ही घरीच येतो आठ वाजता
घरी येणार कधी ? जेवण बनवणार कधी ? जेवणार कधी ?
रात्री उशीराने जेवतो, तसे उशीरानेच झोपतो, ते तसे चालणार नाही का ?
एकत्र कुटुंबात शक्यच नाही हो !
आम्ही दोघंही नोकरी करतो, कसं शक्य आहे ?
सासुबाईना कोण समजावणार ?
“अहो” येत नाहीत लवकर, मग आम्ही त्यांच्या अगोदर कसे जेवायचे ?
बायकोने जेवण बनवायला तर हवे ना !
हे आणि असे असंख्य प्रश्न विचारले जातात. या प्रत्येक प्रश्नाला वेगळे उत्तर देणे कठीण होईल. ज्याला उत्तर देता येईल, त्याने सुचवावे. पण मला असे वाटते, बाहेरची परिस्थिती कधीही न बदलणारी नसते. बदल आतघडावा लागतो.
तर तो कायम स्वरूपी / स्थायी रहातो, नाहीतर आरंभशूरपणा होतो. तसं नको. काठी मारून करून घेतलेल्या अभ्यासाचा काही उपयोग होतो का ? तो आतूनच व्हावा लागतो.
तसा संकल्प आतून प्रेरणा देणारा निर्माण केला की बाहेरील सर्व अडधळे कमी होत जातात.
ईश्वराचे काही नियम असतात. ईश्वर म्हणजे निसर्ग म्हणा हवं तर.
निसर्गाचे नियम सर्वासाठी सारखेच आहेत.
निसर्ग वेळ पाळतो.
निसर्ग कधीही चुकत नाही.
निसर्ग अगदी कठोर आहे.
निसर्ग दुसर्यासाठी नियम बदलत नाही, नियम तोडत नाही.
नियमात चूक झाली की निसर्ग शिक्षा करतोच.
निसर्गाचे सगळे प्राणी त्यांचे नियम पाळतात.
…फक्त मनुष्यप्राणी नियम तोडतो
आणि रोग स्वरूपात शिक्षा भोगतो.
आपण आपले उत्तर कसे शोधायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
10.08.2016
Leave a Reply