अकरावा भाग खास
विशेष आहे अभ्यास ।
धरूनी सर्व शास्त्रास
नैसर्गिक उपवास ।।
बावीस भाग उपासाचे
ठरवले कधी जेवायचे ।
हे कवन फलश्रुतीचे
आपणापाशी ।।
सुर्यास्ताशी जो जेवेल
तो शतायुषी होईल ।
आनंदे भरील
तिन्ही लोक ।।
जेवणानंतरचे दोन तास
आरोग्याचे असती खास
मनी धरूनी ध्यास
संकल्प दृढ करावा ।।
घड्याळाचे दोन तास
पुढे करावे खास ।
सातनंतर बास
निसर्ग म्हणे ।।
जाई वेळ सारा
आवरले जरी भराभरा ।
रात्री वाजती बारा
किचनमध्येच ।।
जेवण एकदाच बनवावे
सकाळचेच उरवावे
शिळे करूनी न ठेवावे
शीतकपाटी ।।
किचनमधील वेळ वाचवावा
टीव्हीसाठी न राखावा
समाज कार्यास खर्च करावा
स्त्रीशक्ती जाणोन ।।
शिजवण्या एकच पात्र
डाळ तांदूळ एकत्र
चालेल एखादी रात्र
भाजलेली खिचडी ।।
वेळ फुका न दवडावा
किचन मधला काढावा ।
सत्कारणी अवघा लावावा
बहुमुल्य असे ।।
काळ सायंसात नंतरचा
बायकोबरोबर फिरण्याचा ।
नव्हे तो जेवण्याचा
बरा नाही ।।
बाजारहाट करावा
एखादा गजरा घ्यावा ।
बायकोसाठी वेळ द्यावा
साध्य सहज होईल ।।
बायको खुश राहील
प्रेमाने पाहील ।
शांतीही राहील
घरामध्ये ।।
भरपूर वेळ मिळेल
कुटुंबासाठी उरेल
वीजही वाचेल
घरातील ।।
जेवूनी फिरायला जावे
मुलांसवे हिंडावे ।
पाय मोकळे करावे
बागेमध्धे ।।
साखर ताब्यात येई
बीपी ही नाॅर्मल होई ।
चरबी झडून जाई
कुठल्या कुठे ।।
पोट हलके होई
भारीपण निघून जाई
काटाही फरक पाही
वजनामधे ।।
सातच्या आत घरात
अन्न घालावे घश्यात
सहजपणे पचूनी जात
पोटामधे ।।
दार बंद करावे
एकदम सकाळी उघडावे ।
पाणी पण न घ्यावे
किचनमध्ये ।।
डाएटींग ऐवजी ड्राय इटींग
घ्यावा चाय पण कटींग ।
नका करू हो चिटींग
स्वतःशीच ।।
दिवसभर छान जेवावे
पथ्य विशेष न पाळावे ।
निसर्गाकडून शिकावे
दिसामाजी काहीतरी ।।
सायं भोजन करावे
नंतर तीन तास जागावे ।
खाल्लेले पचवावे
सूर्योदयापर्यंत ।।
जेवणाची वेळ बदलून
अनारोग्य जाईल पळून ।
आता आले हे कळून
सांगू इतरासी ।।
स्वतःसाठी जगायचे
थोडेफार बदलायचे ।
नैसर्गिक उपवास घडवायचे
निरोगी आयुष्य वाढवायचे ।।
ही फलश्रुती आहे अशी
कुलुपाची किल्ली जशी
होती ती आमचेपाशी
आम्हासीच ठावेना ।।
इति आरोग्यदूत विरचीतम
उपवास महात्मेन भरीतम ।
तेवीसावे भागी झाले खतम
आपणालागोनी ।।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021
11.08.2016
Leave a Reply