नवीन लेखन...

आहारसार भाग १०

रासायनिक खते आणि विषारी फवारणी केलेला गहू, कोकणात तरी न धुता खाऊ नये.

गावठी, देशी गाईच्या दुधाखेरीज अन्य जर्सी हाॅस्टीन एचेफ इ. जनावरांचे सरकारी भेसळ असलेले शिळे दूध पिऊ नये.

किड पडून तयार झालेला, अनेक विरंजके वापरून बनवलेला साबुदाणा खाऊ नये.

मूलतः भारतीय नसलेले, व्यसन होत जाणारे, पित्तासारखे व्याधी वाढवणारे, देशाचा पैसा देशाबाहेर पाठवणारे चहाकाॅफी सारखे विदेशी पेय पिऊ नये.

विषारी फवारणी झाल्यामुळे ज्या द्राक्षांवर माश्यासुद्धा बसत नाहीत अशी द्राक्षे सुद्धा खाऊ नयेत.

जशी द्राक्षे तशीच गत केळ्यांची आणि पालेभाज्यांची सुद्धा !

बरं फ्रीजमधे थंड तापमानाला, भिजवून ठेवलेली, कणिकदेखील आपले योग्य गुणधर्म सोडते, आणि मायक्रोवेव्ह मधे गरम केलेले अन्न पण सात्विक रहात नाही म्हणे !

आभाळच फाटलं तर ठिगळं तरी कुठे कुठे लावणार ना ?

पिप्पलाद ऋषी केवळ पिंपळाची फळे खात असत.
औदुंबर ऋषी फक्त ऊंबराची फळे खाऊन रहात होते.
कणाद ऋषी केवळ गोळा केलेल्या धान्याच्या कणावर जगत होते.
राम लक्ष्मण वनवासात असताना चौदा वर्षे केवळ कंदमुळे, फळे, खाऊन राहिले होते.

आजच्या काळात देखील लमाणी, कातकरी, वनवासी रहाणीमानातील आहार कसा आहे, आणि त्यांचे आरोग्य कसे आहे, हे एकवार जरूर अभ्यासावे.

म्हणजे आम्हीही असेच रहायचे का ?
मग आयुष्यभर सुसंस्कृत रहाण्याचा अट्टाहास का केला ?

हे सगळं सांगून एक प्रकारचा सामाजिक भय निर्माण करणे हा या लेखमालेचा उद्देश नक्कीच नाही.
ऊलट यातून योग्य तो मार्ग काढणे, आणि स्वतःला संतुलीत ठेवण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे.

अति सर्वत्र वर्जयेत् हे मान्य.
आपले अन्नधान्य जेवढे शुद्ध करण्याचा, आग्रह आपण धरायचा नाहीतर कोणी ?
आज 80% लोक असेच वागतात, त्यांना बदलवणे फार कठीण आहे, अश्या या पराभूत मानसिकतेमधून लवकरच बाहेर येणे आवश्यक आहे. तरच आपली पुढची पिढी निरोगी आणि सक्षम तयार होईल.

आपण सुरवातीलाच एक श्लोक पाहिला………
दूष्यं देशंबलम् कालम्….

किर्तनामधे सुरवातीला एक पद निरूपणासाठी घेतात, त्यावर पूर्वरंग सांगतात, मध्यंतरानंतर एखादी कथा त्याच पदावर आधारीत असते. आणि भैरवी पण त्याच पदाने.
चाल बदलून, तेच एक (पालु)पद तीन वेळा वेगवेगळे म्हटले जाते.

तसे तो श्लोक पुनः एकदा आठवून, वाचून पहावा.

आपण, आपली प्रकृती, आपण रहातो तो प्रदेश, तेथील रूढी परंपरा, आपली शरीरातील दोष दूष्यांची स्थिती, आपली शारिरीक आणि मानसिक ताकद, जेवत असतानाची मनातील भीती किंवा तणाव अश्या प्रकारची बदलती मानसिकता, आपले वय, सुरू असलेला ऋतु, असलेली भूक, आपली पचनक्षमता, आपल्या आहारातील पारंपारिक वैशिष्ट्ये, आपली आवड निवड, दरदिवशीची सामाजिक परिस्थिति, अन्नाची उपलब्धता, खरेदीची ऐपत इ. आणखीनही काही गोष्टींचा विचार प्रत्येकाने करून आपले आहार रहस्य नेमके कशात आहे हे आपणच शोधले पाहिजे.

ज्यावेळी आपल्या भारतात प्लॅस्टिक सर्जरी सारखी शस्त्रक्रिया कुंभार लोक अगदी सहजतेने, लीलया करीत होते, त्यावेळी ज्यांना जेवण कसे करावे, कसे रहावे, कसे कपडे परिधान करावे, औषध म्हणजे काय, संस्कृति म्हणजे काय असते, हे माहीत देखील नव्हते, त्या गोर्‍या चामडीच्या लोकांना, आज सर्वस्व आदर्श मानून, फक्त अंधानुकरण करत, आपल्याच शास्त्र परंपरा मोडीत काढणार्‍यांना काय म्हणावे ?

वैद्य म्हणून निद्रीस्त समाजाला जागे करणे, हे वैद्यांचे कर्तव्य नव्हे काय ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
28.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..