नवीन लेखन...

आहारसार भाग ८

रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच.
ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे.

गरज आहे ती शुद्धीकरणाची !
अंतर्बाह्य शुद्धीकरण !
अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत.

जेवढे आपापल्या परिने शुद्ध रहाता येईल तेवढे रहायचे.
जेवढे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न मनापासून करून अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा.
एवढंच आपल्या हाती.

समुद्रासारखं व्हायचं.
समुद्र आतमधे काहीही घाण सामावून घेणारच नाही. जे काही आत नको असेल, ते ते सर्व बाहेर किनारपट्टीवर आणून टाकायचे !

अगदी अनावश्यक विचार सुद्धा !
मनापासून केलं तर नक्कीच यश मिळते,

खाताना जेवढे शुद्ध सात्विक खाता येईल तेवढे खायचे.
म्हणून तर आपण अन्नावर वेगवेगळे संस्कार करतो, ते त्यातील विष निघून जाण्यासाठीच. !

धान्यांच्या बाबतीत, वारवणे म्हणजे वारा देणे, निवडणे, आसडणे, पाखडणे, चाळणे, घोळणे, धुणे, हे झाले प्राथमिक शुद्धी संस्कार.
नंतर चिरणे, कापणे, फोडणे, वाफवणे, उकडणे, शिजवणे, तळणे, परतणे, गाळणे, फुलवणे, फुगवणे, आंबवणे, भाजणे, बेक करणे, हे सर्व संस्कार आपण अन्नावर दररोज अगदी सहजपणे करत असतो.
कशासाठी ?
अन्न सहज पचावे, याकरता सोयीचे व्हावे म्हणून केलेले जाणारे हे शुद्धी संस्कार !

प्रत्येक पदार्थातील विष वेगळे. त्यामुळे त्याची शुद्धी वेगळी. जसे मोहोरी धुण्यासाठी माझी आई मोहोरी पाण्यात घोळून धुवायची.
एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन एक वाटी एका हातात, त्या पाण्यात धरून ती हलवत रहायची. दुसर्‍या हाताने मूठमूठ मोहोरी घेत त्या वाटीत वरून हलकेच सोडायची. म्हणजे मोहोरीतले बारीक दगड पाण्यात घोळल्यामुळे, वाटीत आपोआपच तळाला बसायचे. वरची शुद्ध मोहोरी पातेल्यात यायची. दगड वाटीत जमा व्हायचे.
आणि नंतर पातेल्यातील मोहोरी वाळवायची.

काही पदार्थांची शुद्धी होऊच शकत नाही, म्हणजे जर्सी गाईच्या दुधाची शुद्धी कशी करणार ?
दूध ऊकळून किंवा सुंठ, आले मिरी बाळशेप इ. औषधे घालून देखील या दुधाची शुद्धी होणारच नाही. अशावेळी या पदार्थाना आपल्या आहारातून कायमचे हद्दपार करणे, हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.

अशी शुद्धी जर प्रत्येक पदार्थाची करायची ठरवले तर अन्नशुद्धी फार कठीण नाही.

पण वेळच नाही हो, कसं जमणार, जागाच नाही, माहितीच नाही, आईने शिकवलेच नाही, करायचं कुणी, अश्या वैचारिक द्वंद्वात सतत राहिल्यामुळे आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण हे असलं कालबाह्य काही करायची आमची मानसिक आणि शारिरीक तयारी नाही, असं म्हणून कसं चालेल ?

कुछ (100 बरस ) पाने केलिए
कुछ खोना पडता है !
जिंदगी पाने केलिए
गंदगी को हटाना जरूरी होता है !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
26.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..