नवीन लेखन...

आहारसार भाग ९

अन्नावरचे संस्कार अन्नाचे गुण बदलून टाकतात. मक्याचे दाणे खायचे असतील तर, त्याअगोदर कणीस स्वच्छ तर करायला हवे. त्याच्यावरची आवरणे आणि तूस काढून टाकायला नकोत का ?

तस्संच अन्नाचंही आहे. आपल्याला जसं हवंय तसं आपण शुद्ध करून घेतो, वरून खाली पोटात ढकललं की, आपली जबाबदारी संपली. मग शरीराला जसं हवं तसं, शरीर ते शुद्धकरून घेतं. ही सर्व जबाबदारी यकृतावर असते.

वरून खाली आलेल्या अन्नातील भेसळ दूर करणे, त्यातील विषावर तात्पुरते आवरण घालून बाजूला करणे, चांगले अन्न पचनासाठी पाठवणे, हे पाचन होण्यासाठी जे जे अन्नरस आवश्यक आहेत तेते पुरवणे, नकोत ते पुनः शुद्ध करून घेणे, तयार झालेल्या अन्नरसातून रक्तनिर्मितीला आवश्यक ती तयारी करणे, तयार रक्तातील दोष शोधून ते मूत्र, रज, घामाद्वारे बाहेर काढणे इ. सर्व शुद्धीकरणाचे काम यकृत करीत असते.

पुरवून पुरवून वापरणे, अत्यंत आवश्यक तेव्हाच नवीन उत्पादन करणे, नाहीतर टाकाऊतून टिकाऊ तयार करणे हा तर यकृताचा आवडीचा छंद !

आपण जेवढे शुद्ध अन्न आतमधे देऊ, तेवढे यकृताचे काम कमी होते, त्याला पुरेशी विश्रांती देखील मिळते. काम करून दमल्यानंतर परत ताजेतवाने होऊ शकते. एकदम फ्रेश !

नाहीतर हे यकृत, कामाच्या ओझ्याखाली एवढे दबून जाते की, स्वतःच्या मूलभूत गरजांकडेदेखील त्याला लक्ष देता येत नाही. अगदी एखाद्या राबराब राबणाऱ्या आदर्श गृहिणीसारखे. मग कधीतरी ठिणगी उडाली आणि स्फोट झाला तर दोष कुणाचा ?

सावध तो सुखी अशी एक म्हण आपल्याकडे आहे. वेळीच घातलेला एक टाका पुढील नऊ टाके वाचवतो, असे पाश्चात्य तज्ञ देखील म्हणतात.

यकृताकडे आतून लक्ष देणे म्हणजेच घातक रसायनांपासून दूर रहाणे. आज एवढी विषे आपल्या अवती भवती आहेत, त्यातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर विवेकाने वागले पाहिजे.

एकतर टोटल प्रिव्हेंशन, नाहीतर टोटल क्युयर

काय योग्य, काय अयोग्य हे वेळीच ठरवता आले पाहिजे. अनावश्यक विषे टाळू शकलो तर आवश्यक ती विश्रांती आपण आपल्याच यकृत किडनी या अवयवांना देणार आहोत.

हलाहल पोटात गेले तर, पुढे धोका आहे, हे वेळीच ओळखून, ते विष योग्य त्या ठिकाणी रोखून, शोषून, कंठामधेच धारण करणारे हलाहलधर, नीलकंठ व्हावे.
हे झाले टोटल प्रिव्हेंशन

आणि टोटल क्युयर करायचे असेल तर …???

वेळप्रसंगी प्रजेचे रक्षण झालेच पाहिजे, हा उदात्त हेतू लक्षात घेऊन, यमुनेतील कालीयाच्या विषारी डोहात उतरून, जमीन, पाणी आणि आसमंतामधे विष निर्माण करणार्‍या, या कालीयांच्या डोक्यावर थयथय नाचून, रक्त ओकेपर्यंत नामोहरम करून, त्याला त्याच्याच देशातून, दहशत निर्माण करणारा, आणि डोह सोडून जाईपर्यंत, पाठपुरावा करणारा गोपालक कालीयामर्दक बालकृष्ण तरी व्हायला हवे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
27.08.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..