नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – भाग १३

‘घुसळण्याची’ प्रक्रिया महत्वाची. दही ‘घुसळण्याच्या’ प्रक्रियेमधे आत तयार झालेला वायु बाहेर पडतो, नंतर त्यातील लोणी बाहेर येते.

या प्रक्रियेमधे थोड्याफार प्रमाणात अग्निचा संचार होतो. घर्षण झाले की अग्नि तयार होतो.
जसे खूप बोलल्यामुळे घसा गरम होतो, तळहात एकमेकांना घासले की हात गरम होतात, कपालभाती केली की छाती गरम होते, भ्रामरी केली की कपाळ गरम होते, खूप धावले की पाय गरम होतात, विचार खूप झाले तर डोस्कंही गरम होते, वृक्ष एकमेकांना घासले की प्रत्यक्ष वडवानलच तयार होतो. घर्षणाचा अग्निशी अगदी जवळचा संबंध असतो, हे तर आपण व्यवहारातही बघतो.

हा अग्निच रूपांतरणाची प्रक्रिया घडवण्यासाठीचे मुख्य कारण आहे. जेवढा अग्नी जास्ती, तेवढे रूपांतरण जास्ती.

रूपांतरण म्हणजे बदल. किंवा आपण असेही म्हणू शकतो, की जिथे जिथे बदल होतो तिथे तिथे अग्निचे कार्य सुरू असते. बदल म्हणजे अग्नी.

तांदुळ आणि पाणी एकत्र करून बदल होत नाही, तर त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचे रूपांतर भातामधे होते, नाहीतर एकतर मऊभात अन्यथा खरपूस खमंग !

कुठेही गेलात तरी अग्नीचे कार्य लक्षात घ्यावेच लागते.
हा अग्नी प्रमेहामधे विचारात घ्यावा लागतो. क्लेद कमी करण्यामधे अग्नी महत्वाचा. म्हणजे प्रमेहाचा मुख्य शत्रु जो क्लेद, तो नष्ट करणारा अग्नी, हा प्रमेहाचा शत्रू ठरतो. प्रमेहाचा शत्रू तो आपला मित्र !

दही घुसळण्याच्या प्रक्रियेत अशीच अप्रत्यक्ष उर्जा तयार होते.
आता दही घुसळणे कसे करतो यावर त्यातील क्लेदाचे रूपांतरण होणे अवलंबून आहे. ही युक्ती आहे.
हाताने लाकडी रविने दही घुसळणे, ताकमेढीला दोरी गुंडाळून दोन्ही हाताने उलटसुलट रवि घुमवणे, आणि मिक्सरमधून दही फिरवणे, आणि चमच्याने दही ढवळणे, या कृतीवर तयार होणाऱ्या पदार्थाची गुणवत्ता ठरत असते. चमच्याने दही कालवण्यामुळे केवळ त्यातील वायु बाहेर पडेल, त्याची वडी मोडेल, एवढेच काम होईल, पण ‘क्लेद’ कमी होणार नाही. क्लेद कमी होण्यासाठी आणखी उष्णतेची गरज असते.

हो. हो. हो. दही गरम करता येईल का असं अजिबात मनातही आणू नका. ओहोऽऽऽ.
दही गरम करायचे नाही. कधीही नाही. अगदी पंजाबी ग्रेव्हीमधे पण नाही.

कोणत्याही गोष्टीत इन्स्टंट, शाॅर्टकट उपयोगी नाही. ज्या गोष्टीला जेवढा वेळ जाणं अपेक्षित असते, तेवढा वेळ देणं अपेक्षितच असते. नाहीतर एक वर्षाच्या पोरग्यानं बाबांचा शर्ट घातला आणि बूटात पाय घातले तरी तो ‘बाप’ होत नाही ना !

तसंच दह्याचंही आहे. त्याचे रूपांतर ताकात करताना काही काळ जाणं अपेक्षित असतं. सावकाश आणि सतत घुसळणं,
हो, हातानं रवीनं घुसळणं वेगळं, रवी दोरीला बांधून घुसळणे वेगळे, मिक्सरमधून फिरवण्याची तऱ्हा वेगळीच ! आणि लस्सी करणं वेगळं. प्रत्येकावर होणारी अग्नीची प्रक्रिया वेगळी !
इथं प्रत्येकाचं वेगळेपण वेगळं….
त्याचंच नाव आयुर्वेद !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
29.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..