नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – भाग १५

प्रमेह हा मुख्य आजार. त्याच्या एकुण वीस उपप्रकारामधे एक म्हणजे मधुमेह हा आजार येतो. हा आजार होऊ नये यासाठी काय काय करू नये, (म्हणजे अपथ्य ) सांगितले आहे ते आपण पाहातोय.

व्यवहार आणि ग्रंथ यामधे किती अंतर आहे पहा. पथ्य आणि अपथ्य या शब्दांचे किती चुकीचे अर्थ वापरले जातात.
“मधुमेह एकदा झाला की साखरेचे पथ्य सुरू झाले.” असे आपण म्हणतो. म्हणजे साखर बंद करावी लागणार असे आपल्याला सूचीत करायचे असते. खरंतर पथ्य म्हणजे खायला हरकत नाही, असा अर्थ होतो. आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
सगळं च उलटं चाललंय, म्हणतो ना मी, त्यातीलच हे एक !

तर पथ्य म्हणजे चालणारे
आणि अपथ्य म्हणजे न चालणारे.
मधुमेहात साखरेचे अपथ्य आहे.

त्यातील दूध आणि दही आपण पाहिले. म्हणजे दुध आणि दह्यापासून बनणारी अन्य सर्व गोड व्यंजने अपथ्यकर आहेत. पण दह्यापासून बनणारे ताक, घुसळल्यामुळे वर तरंगणारे लोणी, लोणी कढवल्यानंतर बनणारे साजूक तूप हे मधुमेहात अपथ्य नाही. तसेच गाईपासून मिळणारे मूत्र आणि शेण हे सुद्धा मधुमेहात पथ्यकर आहेत. हे लक्षात ठेवूया. सर्वसाधारणपणे असं म्हणायला हरकत नाही, की जसजसा अग्निचा संस्कार होत जातो, तसतसा पदार्थ पचायला हलका होत जातो.

स्थिरता आणि गतीमानता हे दोन गुण लक्षात घेतले की, अग्निचा विचार नीट करता येईल. जिथे गती तिथे अग्नी. गती म्हणजे वात. वायु हा अग्नीचा मित्र आहे. म्हणून फुंकर मारली की अग्निवृद्धी होते. बरोबर ना ! स्थिरता म्हणजे पृथ्वी महाभूत. अग्नीच्या विरोधी. अग्नी विझवण्यासाठी वाळू उपयोगी पडते. व्यवहारात जिथे अग्नी खूप असेल आणि तो कमी करायचा असेल तर अग्नीला मिळणारा वारा बंद करून, पृथ्वी महाभूत असलेली माती किंवा वाळु उपयोगी होते.हेच तत्व आरोग्याच्या बाबतीत शरीरात वापरून पहायचे.

प्रमेहामधे अग्नि बिघडलेला असतो. त्याचे बदललेले स्थान कुठे आहे ते ओळखून त्याला परत जागेवर आणून ठेवणे ही चिकित्सा.

आयुर्वेद समजून घेण्यासाठी ही महाभूते खूप उपयोगी पडतात. ही केवळ प्रतिके नाहीत तर व्यवहारात ती आपण वापरतदेखील असतो, पण आपल्या ते लक्षात येत नाही.

एखादी गोष्ट व्यवहारात अनेकदा आपण करीत असतो, पण त्याचा कार्यकारण भाव माहीती नसतो. त्याचे चिंतन मनन करणे, आणि तो शोधून काढणे, नंतर ती गोष्ट जाणीवपूर्वक करणे याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाची एकदा सवय लागली की, नंतर कठीण गोष्टी समजायला सोप्या व्हायला लागतात. मग ग्रंथ आणि व्यवहार एकच आहेत असे समजायला लागते.

प्रमेह होण्याच्या मुख्य कारणामधे सर्वात प्रथम सांगितलेला शब्द आहे, आस्यासुखम्.
आसन सुख. म्हणजे बसून राहाण्यामधे खूप आनंद वाटायला लागणे. एकाच जागी बसून काम करायला आवडणे. हे स्थिरत्वाकडे जाणारे लक्षण आहे.हालचाली कमी करण्याकडे कल निर्माण होणे, आणि प्रत्यक्षात हालचाली कमी करणे, म्हणजे गतीच्या विरोधात काम करणे, म्हणजे अग्निच्या विरोधात काम करणे.म्हणजे रोगाच्या जवळ जाणे होय.

आळस हेच सुख आहे, असे वाटू लागणे म्हणजे प्रमेहाची सुरवात झाली असे खुशाल समजावे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
31.01.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..