टळटळीत दुपारी तेनालीरामने एका व्यक्तीला त्याच्या डोक्यावर सूर्यापासून आडोसा करताना पाहून उत्सुकतेने विचारले, “मित्रा तू हे काय करतो आहेस?”
मित्र: सूर्य खूपच तळपतोय, त्याला लपवण्याचा प्रयत्न करतोय.
तेनाली: त्यासाठी इतका का त्रास करून घेत आहेस? एक सोपी युक्ती आहे.
हे बघ..
असे म्हणत तेनालीरामने वाळू उचलून त्याच्या डोळ्यांत फुंकली.
तात्पर्य, मनातल्या इच्छापूर्तीमुळे आपल्याला आनंदप्राप्ती होईल या या भ्रमात आपण असतो आणि मग त्यामागे धावताना आनंद घ्यायचे राहूनच जाते. इच्छा या डोळ्यांतील वाळूच्या कणाप्रमाणे असतात, त्यांच्यामुळे आपण आपल्याकडे असणाऱ्या वस्तुमधील सौंदर्य पाहू शकत नाही.
Leave a Reply