आई तुझ्या प्रेमाची काय गाऊ मी महती
दुःख, यातना सोसून दाखविली मज सृष्टी
दारिद्रयाशी झुज देत पुरविले लाड माझे
दारिद्रयाशी झुज देत पुरविले लाड माझे
सांग आई मी कसे फेडू पांग सारे॥
रात्र-रात्र जागुनी तळहाताच्या फोडापरी जपले
दुःखी असो वा कष्टी कधी दुर मज नाही लोटले
सुसंस्काराचे बाळकडू पाजतांना जिवाचे रान केले
सांग आई मी कसे फेडू पांग सारे॥
स्वतः उपाशी राहूनी पिलापरी घास मला भरविला
रात्र-दिवस सांभाळण्याचा जणू ध्यासच तू घेतला
रात्र-दिवस सांभाळण्याचा जणू ध्यासच तू घेतला
खट्याळपणाने माझ्या, रागविती तुला छोटे मोठे
सांग आई मी कसे फेडू पांग सारे॥
आई तुझ्या प्रेमाची उणीव भरून न येई
तुच माझी शक्ती आणि तुच माझी संपत्ती
आईला माझ्या दिर्घायुषी ठेवो, हिच देवाला विनंती
म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी॥
— अनिल शिंदे
Leave a Reply