आहेस गं अशी कशी तूं
आहेस गं अशी कशी तूं
कृपाळू, आनंदु, फ़ुलवारुं
आहेस गं अशी कशी तूं ।।
आई आहेस गं
वसंतातही या फुलतेस तूं
ऋतुवर्षातही बरसतेस तूं
कवटाळीसी शिशिरात तूं
गारवा चंदनी, ग्रीष्मात तूं ।।
आई आहेस गं
व्यापुनी, व्योमही तूं सारे
वसतेस गं या जिव्हारी तूं
सजवूनीया, या अंतराला
गंधाळतेस मम जन्मास तूं ।।
आई आहेस गं
एकांती तुज मी गं स्मरता
शब्द अबोली, रसना गाते
झरझरता गं, नयनी अश्रू
ओघळूनी येतेस तूच गं तूं ।।
आई आहेस गं
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०८.
१३ – ८ – २०२१.
Leave a Reply