आई हि सगळ्यांची सारखीच.आई वर तसे बरेच लेख आणि कविता आपण वाचल्या असतील पण तरीही एक छोटासा प्रयत्न.
आई हि कोणाला प्रिय नसते.प्रत्येक मुलाला किंवा मुलीला आई हि प्रिय असतेच .त्यात हि मुलीला जास्त माया असते असं म्हणतात.मी हि माझ्या आईची एक मुलगीच.
बालपणीचे दिवस आठवले कि डोळ्यात पाणी तरळते.आईने आपली किती काळजी घेतली.आपल्याला कमी पडू नये म्हणून ती सगळ्यांच्या शेवटी जेवायची.परीक्षेच्या दिवशी ती सुद्धा आपला अभ्यास घेण्यासाठी रात्रभर जगायची आणि परत सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डब्बे करायची.सकाळी शाळेत जाताना केसांना खूप तेल लावून २ वेण्या घालून द्यायची.
उन्ह्याळाचे दिवस आले कि मला लोणचे पापड आवडते म्हणून लोणचे घालायची.शेजराच्या बायकानासोबत मिळून घरीच कुरडया उडदाचे पापड चकल्या बनवायची.
आपण आईला कितीही बोलत असू किंवा तिच्या वर रागावू.तिने केलेल्या भाजीला नाव ठेवू.तरी हि आपली आई आपल्य्साठी तिच्या आवडी निवडी बाजूला ठेवून सगळे सहन करते पण त्या वेळेस आपल्याला हे जाणवत नसते.
पण म्हणतात ना एका मुलीचं आईपण जागृत होते जेव्हा ती स्वतः आई होते.पण जेव्हा मी आई झाली तेव्हा हॉस्पिटलच्या बेड वर च माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले.तो दिवस हि जागतिक आई दिवस होता. पण नेमकी माझी आई माझ्या जवळ नव्हती कारण ती या जगातच नव्हती.आज मला माझ्या आई साठी भरपूर काही करावेसे वाटते पण आता ती माझ्या सोबत नाही.आज माझ्या कडे सगळे आहे.पण तरीही हृदयाचा एक कोपरा कायम रिकामा वाटतो.काहीतरी हरवल्यासारखे वाटते.
जोपर्यन्त तुमची आई तुमच्या सोबत आहे तोपर्यंत तिला जपा. तिला हवे नको ते बघा. गेलेले दिवस परत येत नाही. कारण आईची जागा कोणी दुसरे घेऊ शकत नाही.
— वृषाली लवेश चौधरी
Nice