आता सध्या सुरू असलेला संप. ह्या संपात मुळात शेतकरी किती आणि राजकारणी किती हा संशोधनाचा विषय आहे. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे ‘शेतकरी आई’ कष्टाने कमावलेलं लेकरांच्या, झालंच तर घरच्या कुत्र्या-मांजरांच्या घशात घालते, पण असं माज आल्यासारखं रस्त्यावर कधीही फेकून देत नाही. आज रस्त्यावर फेकलं गेलेलं अन्न व दुध खऱे शेतकरी बाजारात विकायला निघाले होते व काही झुंडशहांनी ते जबरदस्तीन अडवून रस्त्यावर फेकून दिलं अश्या बातम्या पेपरात आहेत. विकायला निघालेले खरे शेतकरी व त्यांचा माल जबरदस्तीने अडवून रस्त्यावर फेकणारे खोटे शेतकरी अशी विभागणी मी करतो. स्वत:चा माल गुदामात सुरक्षित ठेवून दुसऱ्या शेतकऱ्यांचा माल, भाजीपाला, दुध युनियनच्या जोरावर काढून घेऊन रस्त्यावर नासाढी करायचा, ही काहीशी काश्मिर खोऱ्यातल्या अलगांववाद्यांसारखी मानसिकता आहे. स्वत:च्या पोरांना परदेशात उच्च शिक्षणाला पाठवायचं आणि लोकांच्या मुलांना शाळा सोडून लष्करावर दगड मारण्यासाठी उचकवायचं असा प्रकार हा आहे असं माझं मत आहे. कष्टाने कमावलेलं, पिकवलेलं, ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ माणणारा हाडाचा शेतकरी, असं रस्त्यावर कधीही फेकून देणार नाही, कारण तो परिस्थितीने गरीब असला तरी संस्कृतीने श्रीमंत आहे. ‘आई’ असं शिदवलेलं उकिरड्यावर फेकून संपावर जात नाही हे जे म्हणतो, तो एवढ्यासाठीच…
पूर्ण वाचण्यासाठी खाली नमूद केलेल्या लिंकवर क्लिक करा..!
https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1356283091093211
Leave a Reply