जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.
— ठणठणपाळ परभणीकर
Leave a Reply