नवीन लेखन...

आई ती आईच – भाग दोन

१९९९ मधे माझे धुळ्याला पोस्टिंग असतानाचा असाच एक हृद्य अनुभव. उन्हाळ्याचे दिवस होते. रात्री ८.३० वाजता सुद्धा डांबरी रस्ता तापलेला. मी धुळे शहरातून स्टाफसह night round दरम्यान नरडाणा मार्गे शिरपूरकडे निघालो होतो.

सोनगीर जवळ ,रस्त्यावरून चाललेल्या एका बैलगाडीला ओव्हरटेक करताना पाहीलं तर गाडीमागे दोरीला एक बकरी बांधली होती . बकरी चालून चालून थकल्यामुळे खाली पडली होती आणि गाडीबरोबर रस्त्याला फरपटत, घसपटत पुढे पुढे जात होती. आम्ही बैलगाडी थांबवली. गाडीवानाला मागे बकरीचे काय हाल चालले होते त्याचा पत्ताच नव्हता. तोपर्यंत माझ्या स्टाफपैकी अशोक रामराजे यांनी रस्त्यावर बसून बकरीचे डोके मांडीवर घेऊन गाडीतील पाण्याच्या बाटलीतील पाणी तिच्या तोंडावर शिंपडण्यास सुरुवात केली होती.

बेशुद्ध बकरीच्या जीवात जीव येऊ लागला होता. ती क्षीण हालचाल करू लागली. तेवढ्यात विविध प्रकारच्या सामानाने भरलेल्या बैलगाडीच्या दिशेने बारीकसा ” बें ” असा आवाज आला. बाळाचा आवाज कानावर पडल्याक्षणी बकरीने स्प्रिंगसारखी हालचाल केली . ती आवरता आवरेना. बाळाच्या विचाराने ती स्वत:च्या वेदना पूर्ण विसरली. तिचा पुढचा प्रवास गाडीतूनच होऊदे असं गाडीवानाला मी बजावले. बकरीला उचलून गाडीमधे ठेवत असताना तिच्या आचळामधून लागलेल्या दुधाच्या धारानी रामराजेंचा शर्ट भिजला. पुढे तर विलक्षण घडले. बकरीला गाडीत ठेवल्यावर , सामानातील खालीवर लावलेल्या नगांमधे, ज्या पोकळीत तिचे पाडस होते तिथे धडपडत जाऊन , मागचे पाय रुंद करून , आपली आचळ पाडसाच्या तोंडाजवळ नेऊन त्याला दूध पाजूनच ती शांत झाली.

आई ती आईच.

अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..