नवीन लेखन...

आज कार्तिक शुद्ध एकादशी….!

आज कार्तिकी एकादशी. सर्वांना कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा
हिंदू पंचांग नुसार कार्तिक मासे शुक्लपक्षी येणाऱ्या एकादशीला, म्हणजेच दिवाळीतल्या भाऊबीज सणानंतर बरोबर दहाव्या दिवशी पंढरीच्या विठ्ठल नामे आस्था ठेवून त्याच्याच जयघोषात, उपासांतर्गत प्रतिवर्षी आनंदाने साजरा करावयाचा सण म्हणजेच आज ३१ आक्टोबर ला अखंड भारतात साजरी होणारी “कार्तिकी एकादशी” होय.
खरतर हिंदवी वर्षाच्या प्रत्येक मासी दोन एकादशी येतात.आणि ह्या दोन्ही दिवशी भगवान विष्णू निवासी वैकुंठाचे महाद्वार उघडे असते असे म्हणतात. आणि श्रीविष्णु तर आपले व ह्या सृष्टीचे पालनहार, म्हणूनच कित्येक भक्तजनां कडुन बाराही महिन्यातल्या ह्या दोन्ही दिवशी श्रीविष्णुची आराधना व उपासना करण्याची पध्दत आपल्या हिंदू धर्मात परंपरागते रुजवात आहे.परंतु फक्त आषाढातल्या आणि कार्तिकेतल्या आद्य एकादशीलाच फार महत्व असल्याने, या दोन्ही दिवशी कुणीही आत्मश्रध्देने केलेली श्रीविष्णुची उपासना त्या प्रत्येक व्यक्तीला अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात.
ह्या दोन एकादशींचे महत्त्व काय असेल ..? आणि ह्याच दोन दिवशी खासत्वे मध्य व दक्षिण भारतातील कित्येक कित्येक लाखो लोक आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूर गांवी येऊनच श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यात धन्यता मानतात. असे का..? काय असेल रहस्य ..??
ऋग्वेदात तर असे लिहिलेले आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीविष्णु निद्रिस्त होवून चार महिन्यां नंतर म्हणजेच कार्तिक एकादशीच्या दिवशीच निद्रेतून उठतात. म्हणूनच त्यांच्या ह्या चार महिन्याच्या विश्रांतीलाच चातुर्मास म्हणण्याची प्रथा पूर्वापार रुजुवात आहे.
ह्यामुळेच तर आषाढी एकादशीला “देवशयनी एकादशी” आणि कार्तिक एकादशीला “देवउठनी/प्रबोधिनी एकादशी” असे पूर्वापार संबोधिले जाते. शरीर जरी निर्दिस्त असले तरी श्रीविष्णुंचा आत्मा कायम जागृत असल्याने मानवसृष्टी च्या जगत्पालनेत तसूभरही त्यांच्या कडुन दुर्लक्ष होत नाही. म्हणूनच ह्या चातुर्मासात त्यांच्या आत्मलहरीने संपूर्ण ब्रम्हांड व्यापले गेले असल्याने खासत्वे ह्या दिवसांत त्यांच्याप्रती आस्था ठेवून त्यांच्याच नांवे केलेली भक्ती/उपासना/आराधना अत्यंत फलदायी ठरते असे वेदवचनही आहे.
उत्तर भारतातील जगन्नाथ पुरी, दक्षिणेकडील वेंकटरमणा तिरुपती,आणि मध्य भारतातील पांडुरंग पंढरी ही तर श्रीविष्णुंची स्वयंभू व ज्वलंत अशी युगानुयुगे मान्यता असलेली पवित्र देवस्थाने असल्याने त्यांच्या भेटी दरम्यान साक्षात भुलोकी वैकुंठ दर्शनाच्या अनुभूतीचा लाभ घडत असल्याने आजही वैष्णव भक्तजन लाखोंच्या संख्येत त्या त्या ठिकाणी जाऊन समक्ष भेटीत विष्णुंच्या दर्शनाचा लाभ घेतात. आणि त्यातूनही ह्या दोन एकादशीं दिवशी तरी प्रतिवर्ष वरील प्रत्येक देवस्थानी, वैष्णवजनांच्या प्रचंड गर्दीचा उच्चांक पार दाटत असतो हे विशेष.
जगन्नाथ पुरी व वेंकटरमणा तिरुपती ही अतिश्रीमंत देवस्थाने असूनही VVIP व्यतिरिक्त त्यांच्या गाभाऱ्यात अगदी कुणालाही प्रवेश दिला जात नाही. फक्त उघड्या डोळ्यांनी श्रीविष्णुंचे नेत्रसुखद दर्शन घेण्याचा लाभ मात्र प्रत्येकाच्या नशीबी तेवढे घडतं हेच भाग्य म्हणायचं.परंतु आपल्या महाराष्ट्रातील पंढरपुरात मात्र सर्वच जातीधर्माच्या गरीब श्रीमंतांना तसेच लुळे पांगळे व आंधळ्यांना देखील गाभाऱ्यात प्रवेश असुन विठ्ठलाच्या पदस्पर्शाने सर्व भाविकांना जीवन धन्य व सार्थक झाल्याची अनुभूती प्राप्त होते हे खरोखरच प्रत्येक भाविकाचे अहोभाग्यच म्हणावं लागेल.
त्यामुळेच तर खऱ्या अर्थाने भुलोकी च्या मानवाला प्रत्यक्ष विष्णुदर्शनाचा स्पर्श-लाभ घडत असल्यानेच अखंड भारतात पंढरपूरलाच वैष्णवांकडून विशेष प्राधान्य दिले जाते हेच खरं उल्लेखनीय.तसे तर पंढरीच्या विठ्ठलाचा इतिहास आणि आषाढी एकादशीला पंढरीचे महत्त्व आहे. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. कार्तिकी एकादशी म्हणजे संप्रदायाच्या मर्यादा ओलांडून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवण्याचे व्रत..!! या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते. हे असे का..?
एकतर ही गोष्ट ‘हरि आणि हर’ म्हणजे ‘श्रीविष्णु आणि शिव’ यांच्यातील अद्वैत दाखवणारी आहे. दुसरे अध्यात्मशास्त्रीय कारण म्हणजे कालमाहात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्रीविष्णूची पवित्रके, तसेच तुळशीमध्ये शिवाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे या दिवशी शिवाला तुळस आणि श्रीविष्णूला बेल वाहता येतो…
ईश्वरप्राप्तीसाठी धडपडणार्याय भक्तांनी ‘शैव-वैष्णव’ भेदाच्या आधारे एकमेकांस विरोध करणे, हे त्यांची संकुचित वृत्ती आणि ईश्वराविषयीचे अज्ञान यांचे द्योतक आहे. हे अज्ञान दूर व्हावे, तसेच भक्ताने संकुचित वृत्तीचा त्याग करून म्हणजेच स्वसंप्रदायाच्या सीमा लंघून श्रीविष्णु आणि शिव यांचे ऐक्य अनुभवावे, हाही या व्रताचा महत्त्वाचा उद्देश आहे कारण ईश्वर हा संप्रदायांच्याच नव्हे, तर सर्वच बंधनांपलीकडे असतो.
स्वर्गमोक्षप्रदा ह्येषा शरीरारोग्यदायिनी ।
सुकलत्रप्रदा ह्येषा जीवत्पुत्रप्रदायिनी ।
न गंगा न गया भूप न काशी न च पुष्करम् ।
न चापि वैष्णवं क्षेत्रं तुल्यं हरिदिनेन च ।
एकादशी ही स्वर्ग, मोक्ष, आरोग्य, चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे. गंगा, गया, काशी, पुष्कर, वैष्णव क्षेत्र यांपैकी कोणालाही एकादशीची बरोबरी करता येणार नाही. एकादशी हरिदिन म्हणजेच श्री विष्णूचा दिवस..!
आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला,शेषशायी भगवान श्री विष्णु झोपीजातात म्हणूनच आषाढी एकादशीला “शयनी एकादशी” असे देखील म्हणतात.
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ म्हणजेच कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. या एकादशी दिनी पंढरपुरातल्या पांडुरंगाचे दर्शन घ्या आणि शेअर करून इतरांना देखील दर्शन घडवा. जय हरी विठ्ठल.
जय जय राम कृष्ण हरी।
जय जय राम कृष्ण हरी॥
जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल ॥

Avatar
About गणेश कदम 48 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..