
कुतूहल वाटलं म्हणून त्या बद्दल गुग्गल करून वाचलं..इतिहास वाचला…त्यातले बदल , दंतकथा इत्यादी सर्व वाचले..
व्हॅलेंन्टाईन डे हा दिवस साजरा करावा का करू नये हे ज्याचे त्याचे मत आहे… पण हे प्रेमाचे दिवस, प्रेमाचे प्रतिक म्हणून या दिवसांत जी कमर्शियल उलाढाल होते, ती पाहून थक्क व्हायला होतं.. वसुधैव कुटुंबकम ( संस्कृत : वसुधैव कुटुम्बकम् ) हा एक संस्कृत वाक्प्रचार आहे जो महा उपनिषद सारख्या हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो , ज्याचा अर्थ “जग एक कुटुंब आहे”… ज्ञानेश्वरांनी सांगितले..
“अवघे विश्वची माझे घर..”
हल्ली काही वर्षातच हे आपल्याला नव्यानी जाणवायला लागले आहे. पूर्वी आपण फक्त भारतीय संस्कृती प्रमाणे सण साजरे करत होतो . आपली जीवनपध्दती, आचार विचार, आहार, शिक्षण पध्दती सर्वच आपले होते.. पण आता आपण खरोखरच ,जग म्हणजे आपले कुटूंब मानायला लागलो आणि सर्व इतर देशांतील, धर्मातील, संस्कृतीतील नविन गोष्टी अंगिकारायच्याच या मोहात अडकायला लागलो… ..आवश्यकता नसतांना मार्केटिंगच्या भूलभूलैयाला फसून त्या गोष्टी बंधनकारक आहेत ,असे समजायला लागलो.. तर हे सर्व टेडी डे वाचलं म्हणून मनांत आलं… कोणाचं महत्व कसं वाढतं, कशाशी जोडलं जातं, कोण साजरं करत, कोण डोळे मिटून त्या मार्गावरूनच जातं, प्रथा म्हणून जनामनात ते कसं रूजतं.. हे सगळंच रंजक, कल्पनेच्या पलिकडचं आहे… टेडीचं महत्व असचं वाढलं… टेडी बनवणाऱ्यांच नशिब फळफळलं..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट ह्यांचे टोपण नांव आहे टेडी.. एकदा ते शिकारीला गेले असतांना जखमी अस्वलाला पाहून त्यांचे मन द्रवले , त्यांनी त्याची शिकार केली नाही.त्यांच्या या उदारतेचे चित्र एका व्यंगचित्रकाराने , एका वृत्तपत्रात रेखाटले. ते पाहून एका उद्योगपतीच्या पत्नीला ,खेळण्यातले अस्वल बनवण्याची कल्पना सुचली .म्हणून त्या अस्वलाला टेडी हे नांव देऊन ते राष्ट्रपतींना समर्पित करण्याची परवानगी त्या उद्योग पतींनी मागितली आणि असा या टेडी बेयरचा जन्म २० व्या शतकांत झाला.
हा टेडी एका विशिष्ट प्रकारच्या बकऱ्याच्या लोकरीपासून बनवतात. तो मऊ आणि सुंदर दिसतो.मुलांना त्याला जवळ घेऊन सुरक्षिततेची भावना होते, त्याला पाहून आनंद होतो, चेहऱ्यावर हसू येतं. या टेडीचा जन्म औदार्य,प्रेम, आणि करूणेमुळे झाला, तो पाहून प्रेम करण्याची इच्छा वाढते म्हणून तो ह्या सर्वांचे प्रतिक बनला आणि कधीतरी तो व्हॅलेन्टाईन डे शी असाच जोडला गेला , आणि जगभर प्रसिध्द झाला.. वेगवेगळ्या आकारातले, वेगवेगळ्या आकाराचे , रंगांचे , नावाचे विविध टेडी त्यातून निर्माण झाले. कोणालाही , कधीही भेट देण्यासाठी योग्य .. अशी त्याची प्रसिध्दी झाली…त्यांच्या किंमती ,त्यानुसार कितीही असू शकतात.
जगातल्या सर्वांत महागड्या “स्टीफ अँड लुई व्हिटॉन “टेडीबेअरची ,गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नोंदवलेली
किंमत 1.36 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. लाल गुलाब, हार्ट शेपच्या वस्तू, ग्रिटींग कार्ड्स आणि टेडी बेअर ह्या सर्वांनी मार्केट मधली सगळी दुकानं ओसंडून जात असतात, सगळीकडे सजावटीसाठी हीच प्रतिकं असतात, वेगवेगळ्या ॲाफर्स असतात, सेल असतात… ते पाहून सामान्यांना या दिवसांबद्दल काही माहिती नसली तरी खरेदी करण्याचा मोह होतो. आणि ते च तर बिझनेस वाचल्यांना हवं असतं. नॅशनल रिटेल फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन लोक या वर्षी व्हॅलेंटाईन डेवर $26 अब्ज खर्च करतील असा अंदाज आहे. म्हणजे जगभर किती खर्च करत असतील?… थक्क व्हायला होतं ना? हे दिवस साजरे करावेत का नाही हा ज्यांचा त्याचा प्रश्न आहे.. ज्यानी त्यांनी ते ठरवावे…
चित्रा मेहेंदळे
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
Leave a Reply