आज ती भेटणार होती दोन अडीच महिन्यानंतर मध्येच बरेच काही घडून गेले होते,
त्या कोरोनाने तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते,
तिचे आईवडील वृद्ध होते
त्या दोघाना बीपी , शुगर चा त्रास होता.
समोरून ती येत होती तोडाला मास्क होता संपूर्ण चेहरा दिसत नव्हता
पण पिकलेले केस दिसत होते,
हाय, काय पाहतोस ती म्हणाली
आम्ही हग केले नाही
किंवा शेक हॅन्ड केला नाही
ती मला आणि मी तिला स्पर्श करू शकत नव्हतो.
बाजूलाच उभे होतो,
समोरून पोलिसांची गाडी दिसली
की झाडामागे जात होतो .
खूप खूप रडली,
ज्या लोकांनी देशात कोरोनाला वेलकम केले
त्याच्या पूर्ण खानदानाला शिव्या शाप देत होती.
भयानक विक्स्टलेली होती.
कारण
तिने तिचे आईवडील गमावले होते,
स्वतः अज्ञातवास भोगून बाहेर आली होती.
हळू हळू तिला ताळ्यावर आणले आज ती एकटी होती,
हो ती एकटी आणि….. ढगाळ आकाश.
खरेच ज्यांच्या घरात मृत्यूने टकटक नसेल केले ना
त्या झेंडेवाल्यांच्या घरावर जरूर करावे ….
इतक्या विषण्णपणें ती म्हणाली तेव्हा कळेल माणसं सैतान बनली की काय घडते ते.
प्रचंड उद्वेग साचला होता तिच्या मनात.
मी विषय बदलावा म्हणून म्हणालो..
जॉब ऑन लाईन चालू आहे ना.,
तशी ती म्हणाली चालू आहे आता कर्ज फेडावेच लागले, आजारपणातले,
कोणाचे भाषण कर्ज फेडणार नाही की कुणाच्या गप्पा.
जरा वेळाने म्हणाली..
खरेच काही डॉकटर देवदूत असतात तर काही यमदूत
,पार भुगा करतात.
शेवटी ज्याचे जळते त्यालाच कळते.
मृत्यू जात पात बघत नाही
तसेच तो ब्लडी बास्टार कोरोना आणि ते हरामखोर
आम्ही खूप गप्पा मारल्या,
जरा माणसात आली .
जाताना शेकहॅण्ड नाही केला,
आम्ही एकमेकांच्या पायांना , पाय लावून गुड नाईट केले अगदी शेक हँड प्रमाणे.
ती जात होती मी विषण्णपणे बघत होतो,
खरे तर आमच्यात आज खूप काही घडले होते
एकेमकांना स्पर्श न करता….
मैत्री अजून घट्ट झाली होती.
सतीश चाफेकर.
Leave a Reply