आज यमुनेचा उर,किती भरुनी आला,
आनंदाने पाण्या तिच्या,
पूर भरतीचा आला,–!!!
गोकुळातील नंदकिशोर,
मदतीस तिच्या धावला,
कालिया — मर्दनाने,
गोकुळीचा त्राता झाला,–!!!
गोकुळ तिचे सर्वस्व असता,
बाल कान्हा तारक झाला,
भितीने तिची काया थरथरता कृष्णस्पर्शे, जीव कृतार्थ झाला-!
गोकुळावरील संकट केवढे,
गोपगोपिकांवर जीवघेणे,
गारठून भीतीने गेले, कृष्णावताराने वाचवले,–!!!
लहानगे ते पुढे धावतां,
बेचैनी येईल त्यांच्या चित्ता,
पुढे उभे ते, आव्हानच संकटा,
मात देत त्या अजस्त्र फण्या,–!!!
यमुनेचे काळीज कापले,
लेकरू जेव्हा उभे ठाकले, ललकारून सामोरी गेले,
डोळा भीती उमटे त्यांच्या,–!!!
थयथयाट शिरावर करतां,
कृष्ण निवांत उभा राहिला,
अवतारआभाळाएवढा,
थक्क त्या सर्वांनी पाहिला,–!!!
सहजच दुर्जनाचा अंत केला,
रंग बदलला यमुनेचा,
कालिंदी नाव तिचे पडता, चेहरामोहराच तिचा बदलला,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply