संस्कार, संस्कार कधी करू बाई
दिवस नि रात्र, आम्हां रोजचीच घाई
सकाळ संध्याकाळ चाले काट्यावर बाई
मनातली ममता कोंडून घेते आई
घरी सोडून जाताना, जीव तुटतोच गं बाई
कामावर असतो फक्त देह, मन कधीच घरट्यात उडून जाई
छोट्याशा पिलापाशी हळूच गिरकी घेऊन येई
कातरवेळी परतीची वाट खूप दूरची होई
पिलाच्या आठवणीत जीव कासावीस होई
घरी येऊन मांडू वाटे, पिलासोबत खेळी
नाही खेळू शकत बाळा, पुन्हा स्वयंपाकाची घाई
सरत्या दिवशी घ्यावे कुशीत नि गावी एखादी अंगाई
सांगावी निवांत गोष्ट, बनून आईचीही आई
तरी नाही सवड बाळा, काय करेल ही आई
मोठा होशील तू कधी, तेव्हा कळेल तूला आईतली जिजाई
— वर्षा कदम.
Leave a Reply