कोणताही बदल घडत असताना एकदम घडत नाही. त्याचे काही टप्पे असतात. काळ अनुकुल असावा लागतो.
महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि स्वतःची साधना वाढवली. परंतु वासुदेव बळवंतांना हे पटले नव्हते. आणि काही निर्णय चुकीचे घेतले गेले, आणि १८५७ चे स्वातंत्र्य समर ठरलेल्या वेळेपूर्वीच सुरू झाले. ठिणगी तर पडली, पण त्याला लागणारे इंधन, रसद योग्य वेळी न मिळाल्याने जो उठाव पूर्ण क्षमतेने व्हायला हवा होता, तो झाला नाही. क्रांतीवीरांची ताकद कमी पडली आणि ते स्वातंत्र्यसमर हे बंड ठरवून मोडले गेले.
कालाय तस्मै नमः हेच खरे. काळाचे, नियतीचे नियोजन जसे होते, तसेच घडत असते, हेच खरे.
अर्थात त्यावेळी क्रांतीची जी ठिणगी पडली ती, प्रत्येकाच्या मनामनात जागृत ठेवली गेली, त्यावेळी जे हुतात्मा झाले, त्यांचे शौर्य आणि बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यापासून पुढील पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली हे नक्कीच !
१५ ऑगस्टला रुढार्थाने स्वातंत्र्य मिळाले पण ते काही खरं स्वातंत्र्य नव्हे. कारण आपण स्वतंत्र झाल्यानंतर, त्या स्वातंत्र्यात स्व नव्हताच ! पूर्वी सांगितलेल्या सहा गोष्टी ज्या स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी होत्या त्या तशाच ठेवल्या गेल्या.
पाकिस्तान एक दिवस अगोदर स्वतंत्र केला. स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच पाकिस्तान हा मुस्लीम देश घोषित केला गेला. रविवारची सार्वजनिक सुट्टी बदलून शुक्रवार केली गेली. पण स्वतंत्र हिंदुस्थानामधे मात्र सर्व धर्म समभाव आणि प्रार्थनेचा दिवस रविवारच राहीला. वंदे मातरम या राष्ट्रगीताऐवजी जनगणमनचे राजकारण खेळले गेले. अशा अनेक गोष्टी काळाच्या ओघात तश्याच राहिल्या. आणि त्याचे परिणाम मात्र पुढील पिढीला अजूनही भोगावे लागत आहेत.
त्या भोगाव्या लागणाऱ्या काही गोष्टीपैकी आरोग्यावर परिणाम काय झालाय, यावर जरा विचार करूया, चिंतन करूया, मनन करूया.
कारण चिंतन मनन करणे सुद्धा आम्ही याच गुलामीच्या परिणामामुळे विसरून गेलो आहोत.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply