नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग सहा

‍‌‌‌‌‌‌‌कानामागून आली नि तिखट झाली.

झटपट गुण देणाऱ्या या पॅथीला समाजामधे लवकर मान्यता मिळाली. घी देखा लेकीन बडगा नही देखा. झटपट गुण दाखवणारी औषधे तेवढ्या झटपट अवगुण दाखवत नाहीत. पण उशीरा का होईना, अवगुण हे दिसणारच.

आयुर्वेदाच्या औषधांना पण अवगुण असतातच ! पण तुलनेने खूपच कमी. आणि गुण आहे तिथे अवगुण दिसणारच. असो.

मुळात भारतीय असणारी आयुर्वेदातील औषधे हळुहळु मागे पडत गेली आणि झटपट गुण दाखवणारी औषधे लवकरच लोकप्रिय होऊ लागली.

पाश्चिमात्य मिशनऱ्यांनी धर्मांतर करण्यासाठीसुद्धा या झटपट गुणधर्मी औषधांचा वापर केला.

मूळ कारणाचा विचार न करता दिलेल्या औषधांचा तात्पुरता परिणाम चिरकाली चांगला कसा होणार ? ही औषधे तेवढ्यापुरती ठीक असतात. पण कायम स्वरूपात जेव्हा हीच औषधे सुरू ठेवली जातात, तेव्हा गडबड सुरू होते.

हे पाश्चिमात्य औषधी शास्त्र जन्माला कसे आले असेल ? यावर विचार करता असे लक्षात आले, की अष्टांग आयुर्वेदातील मूळ ग्रंथ जे यवनांच्या आक्रमणातून वाचले, तेवढ्याच आरोग्य शाखांचा विस्तार आज पाश्चिमात्य वैद्यक शास्त्रात झालेला दिसतो. म्हणजेच अति प्राचीन असलेल्या संहितांचा आधार घेत, ज्यांचा अभ्यास नीट करता आला तेवढ्याच आरोग्य शाखा आज विस्तारीत झालेल्या दिसतात.

जसे एखाद्याला जखम झाल्यावर जो बंध बांधायचा असतो, त्याचे आठ प्रकार आयुर्वेदाच्या संहिता मधे दिसतात. त्याची संकृतोद्भव नावे पण दिलेली आहेत. आजही बंधांची हीच आठ नावे पाश्चात्य वैद्यक शास्त्रात प्रचलीत आहेत. फक्त आंग्ल भाषा वापरली इतकेच ! ज्याला आयुर्वेदामधे स्वस्तिकाकार म्हटले आहे, त्याला त्यांनी ‘फिगर ऑफ एट, म्हटले आहे इतकेच.

पाश्चात्य संशोधक वृत्तीचे मात्र निश्चितच कौतुक वाटते. प्रत्येक गोष्ट लिखित स्वरूपात ठेवणे, उलट सुलट पद्धतीने संशोधन करणे, सर्वत्र एकाच पद्धतीचा अवलंब करून संशोधन करणे इ. अनेक चांगल्या गोष्टींचा त्यात समावेश करता येईल.

हे सर्व संशोधन आयुर्वेदात झाले नाही का, असा भाबडा प्रश्न मनात येतो, याच सर्व पद्धतीचा वापर करून आयुर्वेदातील शास्त्रकार असे सांगतात, इदं आगम सिद्धत्वात……
“हे सर्व आम्ही संशोधन करून प्रमाणित करून, सिद्ध करून ठेवलेलेच आहे. आता आणखी संशोधन करण्यासाठी यात तुमचा वेळ आणि तुमची बुद्धी संपवू नका. ”
फक्त हे सर्व ज्ञान, शिष्यांनी, अनुयायांनी लिखित स्वरूपात न ठेवता, मौखिक परंपरेने संकलीत केले आणि पुढे त्यात दोष निर्माण झाले.

पाश्चात्यांनी जे जे केले, ते सर्व आयुर्वेदातील अर्वाचीन ऋषींना का जमले नाही, त्यांना कुणी अडवले होते का ? मध्यंतरीच्या काळात आयुर्वेदाला उतरती कळा कशी लागली, हा पण मोठा संशोधनाचा विषय होईल.

आत्ताच्या घडीला आजचे आयुर्वेद पदवीधर जसे आवश्यक आहे तसे, डाॅक्युमेंटेशन आणि आवश्यक ते संशोधन करताहेत, ही समाधानाची बाब आहे. समाजमनाचा अभ्यास करून, आपल्यातील दोष घालवून, आयुर्वेदाचे अच्छे दिन दिसण्यासाठी वैद्यांनी एकत्रित प्रयत्न सुरु केले आहेत, हे नक्की !

ही पाश्चिमात्य शास्त्रजनीत औषधे पूतना मावशीसारखी आहेत. वरवर प्रेमळ वाटते, भुरळ पडते, पण अंतरात विष असते. ‘एखादा रोग कायमचा जाण्यासाठी कायमचे औषध घ्यावे लागते’ हीच मुळात चुकीची संकल्पना आमच्या मनात दृढ करून दिली गेली आहे. आणि आम्ही त्यावर विश्वास ठेवून मरेपर्यंत औषधे खात रहातो. आणि पोटाला चिमटे काढत, आयुष्यभर मिळवलेली पुंजी जाताना एखाद्या मल्टी स्पेशालीटी हाॅस्पीटलला अगदी सहज देऊन जातो.

पण वेळीच काळाची पावले ओळखून सावध झालो तर, स्वतः मिळवलेला पैसा स्वतःच्या निरोगी आयुष्यातील आनंदासाठी, अगदी आनंदाने वापरला जाऊ शकतो.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..