नवीन लेखन...

आला ! आला रे पाऊस !

आला  !   आला रे पाऊस !

धरणीला मीलनाची आंस    //धृ//

 

गेली होती तापूनी      रखरखली सारी,

अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।।

थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास

आला  !   आला रे पाऊस !

धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।।

 

पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे,

पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।।

गेली हरळी जळूनी   बीजे टाकूनी आसपास

आला  !   आला रे पाऊस !

धरणीला मीलनाची आंस   ।।२।।

 

आता येईल वनीं     चैतन्य लपलेले,

तरुवेली जाती फुलूनी    पडणाऱ्या जलामुळे  ।।

जाती सारे आनंदुनी     दरवळत मातीचा सुवास,

आला  !   आला रे पाऊस !

धरणीला असे मीलनाची आंस    ।।३।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..