आल्हाद पहाट वारा बोचरा
सकाळ प्रसन्न पारिजातक सडा,
रांगोळी सजली अंगणी तुळशी पूजा
वासुदेव गाई गाणी पसाभर धान्य वसा..
सुंदर सकाळ अशी मनोहर साजिरी
देव पूजा गंध लेपन मंद ज्योत दिवा,
मंत्रमुग्ध होते मन भारावून जातात क्षण
देव आहे अंतरात भाव मुग्ध सकाळ साजीरा..
दिवस जातो सुंदर मन भरुन
चहा मधुर सोबती सकाळ रंगता,
शांत भाव तेजाळती मुख आनंदे
खेडेगावी जावे सोडून कधी जुन्या वाटा..
खिल्लार बैलगाडी हिरवी शेत शिवारे
गावकुस सजतो आनंदमय सारा,
चुलीवरील गरम भाकरी करुन खाता
आहेच जीवनात आनंद हा निर्मळ साधा..
–स्वाती ठोंबरे.
Leave a Reply