पाऊस आला की हापूसच्या आंब्याचा हंगाम संपतो.. जसा गणपतीबाप्पाला निरोप देतात तसाच आंब्यालाही निरोप दिलाय कवीने…
फ्लागून चैत्रापासून लागतात तुझे वेध,
बजेटमध्ये आर्थिक तरतूद थेट !
हळदीकुंकवाच्या निमित्ताने
आंब्याचीडाळ आणि थंडगार पन्हे,
मैत्रिणींना भेटण्याचे कारण जुने !
गृहिणींना आंब्याचा जास्तच जिव्हाळा,
कैरीची चटणी, लोणचे,
छोटया कैर्यांचे बाळलोणचे !
कैर्यांचा मेथांबा,
कांदांबा, साखरांबा आणि गुळांबा !
चैत्र संपता बाजारात हापूस-
पायरीच्या पेट्या लागल्या दिसू,
शाळा-कॉलेजेला सुट्टी लागली,
मामाच्या गावाची ओढ वाढली !
कापून खायला हापूस बरा,
चोखूनखाण्या रायवळची मजा !
रस पीता कळते पायरीची लज्जत,
राजपुरीची निराळीच खासियत !
आंबे खातांना कोपरापर्यंत ओघळ आले पाहिजेत,
कपड्यांना आंब्यांचे डाग पडायलाच हवेत !
जेवणात आम्रखंड, हापूसची बासुंदी केशरी,
मँगो-मिल्क-शेकची दुपारच्या वेळी हजेरी !
जुन महिना संपताच,
बाजारातून आंब्याने पाय काढलाच !
गृहिणी त्याला सहजासहजी निरोप नाही द्यायची,
वर्षभर आम्रखंड, फ्रुटसॅलेड, वड्यांसाठी,
आंब्याचा रस आटवून ठेवती !
जड अंतःकरणाने आंब्यांला
निरोप द्यावाच लागतो,
आंब्या आता निरोप घे,
पुढच्या वर्षी लवकर ये !
जगदीश पटवर्धन, दादर
Leave a Reply