अनौपचारिक शिक्षण देणारी आणि तुम्हा -आम्हांस अंतर्बाह्य बदलून टाकणारी कितीतरी विदयापीठे असतात. सहज मनात आलेली माझी नांवे –
१) क्षेत्र -अभिनय ( विजया मेहता, विक्रम गोखले, दिलीप कुमार , राज कपूर , नसरुद्दीन शाह , ओम पुरी, अमिताभ बच्चन )
२) क्षेत्र -खेळ (सुनील गावस्कर ,सचिन तेंडुलकर)
३) क्षेत्र – शिक्षण ( डॉ जे. पी. आणि चित्राताई नाईक , माझे बहुतांशी शिक्षक )
४) क्षेत्र – संगीत (लता , मदन मोहन , रफ़ी ,बाबुजी ,पं. भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, वसंतराव देशपांडे )
५) क्षेत्र – राजकारण (अटलजी, सुभाषबाबू , वि.दा . सावरकर )
६) क्षेत्र -उदयोग ( जे. आर. डी. आणि रतन टाटा, नारायण मूर्ती, सुरेश हुंदरे )
७) क्षेत्र- साहित्य (पुलं, जी. ए . कुलकर्णी , आरती प्रभू ,ग्रेस ,इंदिरा संत, पु .शि . रेगे)
८) क्षेत्र – समाजकारण (बाबा आमटे)
सहज तयार केली तर तुमचीही अशीच यादी होउ शकेल, नाही ?
या विद्यापीठांचा काही अभ्यासक्रम नसतो , फी नसते , गृहपाठ नसतो ,पदवी नसते , ( तरीही शहाणी माणसे तुम्ही कोणत्या “घराण्याचे ” हे पटकन ओळखू शकतात ) पुस्तके नसतात . सगळी अनुभूतीची पाठशाळा ! AICTE नको ,NBA नको, UGC नको.
फक्त मुक्तहस्ते उधळण ! पण आयुष्य समृद्ध होउन जाते. सार्थकी लागते. हवी मनात कृतज्ञता आणि जाहीरपणे ते ऋण मान्य करायची तयारी !
आणि जमल्यास त्यांच्यासारखे होण्याची इच्छा !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे.
Leave a Reply