आमच्या वेळी शाळा होती खूप खूप छान
शाळेत असताना व्हायचे असे झेंडा वंदन
भल्या पहाटेच आम्ही उठून गणवेश घालून
पळत पळत ओळीत उभे रहायचे जाऊन
मग निघायची मोठीच्या मोठी. प्रभातफेरी
पालक उभे रहात कौतुकाने दारोदारी
भारतमाता की जय. वंदेमातरम गर्जत असू
पालक डोळ्यातील आनंदाश्रू असत पूसू
आम्ही पुढे पुढे वेगात तर बाई यायच्या मागे धावत
मुलांना गाठायच्या धापा टाकत टाकत
एखाद्या मधूनच धपकन पडायचा
मात्र न रडताच चटकन उठायचा
झेंडा वंदन. गुरुजींचे छोटेसे भाषण.
हातातील केळीचा खाऊ करी आमचे पोषण
आई घरी गोडधोड करायची. सण होता खरोखरचा.
आमच्या काळी असा झेंडा वंदन असायचा
भारतमाता की जय वंदे मातरम
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply