नवीन लेखन...

आनंदाचे ठसे

माझ्या बँकिंग करिअरमधे मी अनुभवलेल्या अशाच एका क्षणाची ही अनुभव-कथा! मी युनियन बँकेच्या सोलापूर (कँप) ब्रँचचा मॅनेजर म्हणून नुकताच चार्ज घेतला होता.

कर्ज वितरण आणि ठेवी संकलन या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणे ब्रँच मॅनेजर म्हणून माझ्यासाठी खूप अवघड आणि आव्हानात्मक होते. मी चार्ज घेऊन चार-सहा दिवसच झाले असतील आणि एक वेगळंच नाट्य आकार घेऊ लागलं!

त्या नाट्यातला मीही एक महत्त्वाचा भाग असणार होतो आणि माझी कसोटी पहायला निमित्त होणार होते ते माझेच स्टाफ-मेंबर्स आणि ग्राहक याची  मला त्यावेळी कल्पनाही नव्हती.

नेमकं सांगायचं तर एका अलिखित नाटकाचं आमच्याकरवी ते जणू काही नकळत घडणारं उत्स्फूर्त सादरीकरण असणार होतं जसं काही!

ब्रँचमधे स्टाफ तसा पुरेसा होता. जवळजवळ सगळेच अनुभवी. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅश काऊंटरवरची  सुजाता बोबडे. नुकतीच जॉईन झालेली. त्यामुळे कामाची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे आत्मविश्वासाचाही अभाव. अर्थात हेडकॅशिअर श्री सुहास गर्दे नियमांवर बोट ठेवून काम न करता तिला स्वतःचे काम सांभाळून मदत करायचे म्हणून रोजचं रुटीन व्यवस्थित सुरू होतं एवढंच. एरवी सुजाताच्या वर्क-कॉलिटी बद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. खरं तर कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमीच तपासून पहात असे. गप्पांच्या ओघात मला मिळालेली माहिती सुदैवाने माझे तिच्याबद्दलचे पूर्वग्रह बदलणारी ठरली होती. रिझर्व्हड् कॅटेगरीतून निवड होऊन एक वर्षापूर्वी ती ब्रँचला जॉईन झाली होती. लगेचच नात्यातल्या एका मुलाशी तिचं लग्नही ठरलं होतं. तो एमबीबीएस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर थांबायला हिच्या घरचे. यातून मध्यममार्ग निघतच नाहीये असं पाहून त्या दोघांनीही एक धाडस केलं. घरच्या विरोधाला न जुमानता लग्न करायचं ठरवलं. त्याच्या घरच्यांना हे अर्थातच मान्य नव्हतं. खूप विचार करून त्यांनी मग परस्पर रजिस्टर लग्न केलं. त्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची सगळी जबाबदारी सुजाताने स्वीकारली आणि वेगळं बिर्‍हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि तिची तारेवरची कसरत सुरू झाली. नवऱ्याचं एमबीबीएसचं शेवटचं वर्ष होतं. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी-लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर आला होता! मी ज्या नाट्यपूर्ण प्रसंगाची आठवण सांगणार आहे त्यामध्ये हीच सुजाता बोबडे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार होती हे मात्र तेव्हा मला माहिती नव्हतं!

ब्रँचचा चार्ज घेऊन झाल्यावर मी महत्त्वपूर्ण ग्राहकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. माझ्या घरापासून ब्रँचपर्यंतच्या रस्त्यावरच असणाऱ्या ‘लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूल’चा नंबर मी मनोमन तयार केलेल्या महत्त्वपूर्ण ग्राहकांच्या यादीत सर्वात वरचा होता. या संस्थेच्या बचत खात्यात बरीच मोठी रक्कम शिल्लक असे. शिवाय आठवड्यातून दोनतीनदा तरी थोड्याफार रकमांचा भरणा त्यात नियमितपणे होत असायचा.

आमच्या लहान ब्रँचसाठी तर अशा ग्राहकांना सांभाळणे गरजेचेच होते. त्या दिवशी सकाळी थोडं लवकर निघून मी  मिस् डिसोझांना भेटण्यासाठी प्रथमच त्या संस्थेत गेलो. मिस् डिसोझा या तेथील प्रिन्सिपल कम् व्यवस्थापक. अतिशय शांत आणि हसतमुख. प्रसन्न चेहरा आणि आदबशीर वागणं. कॉन्व्हेटमधील स्टाफ नन्सची कार्यतत्पर लगबग आणि लक्षात यावी, रहावी अशी काटेकोर शिस्त मी प्रथमच अनुभवत होतो. प्रकर्षाने जाणवणारी प्रसन्न शांतता आणि मेणबत्तीच्या प्रकाशात अधिकच तेजोमय भासणारी येशूची मूर्ती माझ्या मनावर गारुड करतेय असं मला वाटू लागलं!

मी स्वतःची ओळख करून दिली. मिस् डिसोझांनी माझं हसतमुखाने स्वागत केलं. गप्पांच्या ओघात मी चांगल्या सहकार्य आणि सेवेबद्दल…

-अरविंद लिमये

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..