नवीन लेखन...

आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. डॅनीबरोबर आनंदी, सुखी आयुष्य जगत असताना २००२ मध्ये अनिता यांना कर्करोगाचे निदान झाले. सुरुवातीला मध्यम स्वरूपाच्या कर्करोगाने कालांतराने भयावह रूप धारण केले.

अनिता यांच्या संपूर्ण शरीरावर त्याने ताबा मिळवला. त्या कोमात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची आशा सोडली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ३० तासांच्या कोमातून त्या जाग्या झाल्या. या काळात शरीराचा ताबा सोडून भौतिक जगापलीकडील जगात त्या पोचल्या. तेथे त्यांना स्वतःची वेगळी ओळख झाली. हा मृत्युच्या समीप असणारा अनुभव (एनडीई – नीअर डेथ एस्कपिरियन्स ) त्यांनी ‘आणि… त्या दिवशी माझा मृत्यू झाला ‘मधून सांगितला आहे.

त्यांना पुन्हा मिळालेल्या आयुष्यात त्यांचा दृष्टीकोन बदलला. भीतीपासून त्या दूर गेल्या. सकारात्मक भूमिकेतून प्रत्येक गोष्ट पाहायची वृत्ती तयार झाली. या सर्व गोष्टींसंदर्भात त्यांनी यात खुलेपणाने सांगितले आहे. याचा मराठी अनुवाद नीता कुलकर्णी यांनी केला आहे.


Author: अनिता मुरजानी
Category: अनुभव कथन, आध्यात्मिक
Publication: WOW PUBLISHINGS PVT. Ltd.
Pages: 240
Weight: 275 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9788184154306

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..