कोणताही प्रसंग असो तुम्हाला तुमचे स्वतंत्र मत अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही…
कोणताही प्रसंग असो तुम्हाला तुमचे स्वतंत्र मत असणे आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही. एकदा इतरांना समजले, की तुम्हाला मत नाही तर ते तुम्हाला गृहित धरू लागतात… यात तुमचे नुकसान होते. त्यामुळे शक्य तेथे आपले मत ठापमणे व्यक्त करता’ आले पाहिजे. अर्थात मत मांडताना दर वेळी उच्च स्वरात ते मांडायला हवे अशातला भाग नाही. शांत व संयतपणे पण ठापमणे आपले मत मांडले तर ‘आपल्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडते. त्यासाठी वेगवेगळे साहित्य वाचा. त्यामुळे मत तयार होण्यास मदत होते. वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो. कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते, नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो. यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो. आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात. तसेच नवीन छंद जोपासायचा प्रयत्न करा. त्यातून तुमचा वेळ सत्कारणी लागतो. तुम्ही चांगला श्रोतां व्हा. समोरचा व्यक्ती काय सांगतोय, हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे. जसे तुम्ही चांगला वक्ता असावेत तसेच चांगला श्रोता असणेही महत्त्वाचे आहे. अन्यथा समोरचे व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून कंटाळतात. तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या काळात तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व कसे घडविता, याला कमालीचे महत्त्व आले आहे. कारण त्याच्या जोरावरच तुम्ही प्रगती करू शकणार असता याचे भान ‘ठेवले पाहिजे आणि रोज आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Leave a Reply