माझी स्वरचित वेंकटेशाची आरती आहे.
रचना: डॉ. दिलीप कुलकर्णी
गायिका: सौ. रेखा कुलकर्णी
साहाय्य : चि. स्वरूपा फडणीस
प्रत्येक ओळीत सात अक्षरे
चाल : आरती ज्ञानेश्वरा
आम्ही फ़क्त याचे करते आहोत. करविता तो श्री वेंकटेशच आहे याची आम्हास नम्र जाणीव आहे.
प्रकाशन : अक्षय तृतीया, १४/०५/२०२१
आरती वेंकटेशा
आरती वेंकटेशा
महालक्ष्मी वल्लभा
तूचि रे मोक्षदाता
भक्तवत्सला नाथा
वत्सला नाथा
आरती वेंकटेशा..।। धृ.।।
दिव्य चरण तुझे
स्वर्ग भक्तांसि भासे
लीन तये होऊनी
द्वारी पावती मोक्षा
पावती मोक्षा
आरती वेंकटेशा…..।। १।।
माता सर्व जगता
पद्मा वक्षे तुझिया
विहरूनी लीलया
हरिप्रिया चंचला
प्रिया चंचला
आरती वेंकटेशा…..।।२।।
पूजिती दिव्यमूर्ती
गाती भाविक कीर्ती
किरीट रत्नांकित
शोभे सुंदर माथा
सुंदर माथा
आरती वेंकटेशा…..।।३।।
पापे भक्तांची वारी
तव तू पुष्कराक्षा
शरण तुज आता
तारी मज कृपाळा
मज कृपाळा
आरती वेंकटेशा…..।। ४ ।।
It is also on U tube Sung by Mrs. Rekha Kulkarni
Leave a Reply