नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग एक

आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ?
मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो,
आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

माझ्या पूर्वीच्या लेखातील काही मुद्दे ओघाओघाने पुनः लिहिले जाणार आहेत, याची मला कल्पना आहे.
पण एखादी गोष्ट एकदा सांगून समजतच नाही, ती वारंवार आणि अनेक वेळा सांगावी लागते, तेव्हासुद्धा ती पटतेच असे नाही, पण नंतर कधीतरी अचानक त्याची आठवण होते आणि पूर्वी सांगितलेल्या उपदेशाच्या गोष्टी डोळ्यासमोरून जाऊ लागतात.

लग्न होण्यापूर्वी मुलीला, जसं तिची आई अनेक वेळा अनेक गोष्टी वेगवेगळ्या वेळी अनेक पद्धतीने समजावून सांगत असते. तेव्हा तर आई हा प्राणी त्या मुलीला जगातील शत्रू नंबर एक वाटत असतो. पण जेव्हा हीच मुलगी पुढे स्वतः आई बनते, तेव्हा आईने सांगितलेल्या सर्व गोष्टी त्या त्या प्रसंगासह तिच्या नजरेसमोरून तरळत जातात. आणि तिला आई होण्यातलं मोठेपण कळतं. तसं काही गोष्टींचं हे वारंवार सांगणं, आपण आईच्या मायेचं समजून घ्याल ही अपेक्षा !

“अरे, लवकर उठ. सकाळ झाली” हे वाक्य तर आपण कितीतरी वेळा ऐकलंय. इथपासूनच आपल्या आरोग्य सवयीमधे बदल व्हायला सुरवात झाली. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं झालं तर,
“अरे ऊठ आता, पहाट झाली. तू ऊठणार कधी, आणि आपली आह्निके आवरणार कधी आणि प्रपंचाला सुरवात कधी करणार ? साडेचार वाजले तरी अजून लोळत राहिला आहेस. सूर्याने तुझे पसरलेले अंथरुण पाहिले तर तो म्हणेल, किती आळशी हा ! अशाने आरोग्य मिळायचे नाही हो ! चल, पटकन उठ बघू,तो बघ सूर्य उगवायला फक्त तासभरच राहिला……”

हे सांगणारी आई त्या मुलाला हाक मारण्यापूर्वीच उठून आपली सर्व आह्निके आवरून तयार होती, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

लवकर निजे लवकर उठे, त्यासी धन आरोग्य संपदा मिळे, हे सुभाषित आठवतंय ना !

पहाटे उठल्याने मन प्रसन्न होते, शरीरातील आळस निघून जातो, आणि ब्रह्ममुहुर्त ही तर अत्यंत सात्त्विक वेळ. म्हणजेच शरीर मन आणि आत्मा प्रसन्न होण्याची सुरवात या पहाटवेळेपासूनच होते.

ब्राह्ममुहुर्ते उत्तिष्ठेत् हे सूत्र पुनः एकदा लक्षात आणून द्यावे लागत आहे. आपले आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे, या मूळ भारतीय विचाराचा आपल्याला विसर पडलाय. नव्हे, हे आपल्या भारतीय विचारांना लागलेले पाश्चात्य विचारांचे ग्रहण आहे.

‍‌‌‌‌‌‌‌ग्रहणात छायेने काळंडलेले शशीबिंब जसे पुनः काळाच्या प्रभावाने पुन लख्ख प्रकाशित होऊन शीतल प्रकाश धारा बरसू लागते,
त्याप्रमाणेच आयुर्वेदावरील पाश्चिमात्य विचारांच्या काळ्या छायेचा प्रभाव लवकरच दूर होईल आणि स्वतःच्या प्रतिभेचा तेजःपुंज प्रकाश साऱ्या जगाला लवकरच दिसू लागेल. पण, कधी हे काळच ठरवेल.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..