१०. झोपण्यापूर्वी पुनः एकदा दंतधावन करावे, असे फक्त आजचेच विज्ञान सांगते असे नाही तर भारतीय संस्कृती सुद्धा सांगते.
रात्री झोपताना कोणत्याही घरगुती अथवा कंपनीमेड दंतमंजनाने दात जरूर घासावेत.
खळखळून चुळा भराव्यात आणि…
परत काहीही तोंडात न टाकता झोपावे.
??
दंतमंजन कोणतेही असो, ते चवीला गोड अजिबात नको, तोंडाला फेस आणणारे नको, आणि रंगाला पांढरे नको.
थोडे तुरट, थोटे तिखट, थोडे खारट असावे. साधे त्रिफळा चूर्ण सुद्धा चालेल. नाहीतर कडूनिंबाच्या काड्यांचे दातवण लय भारी ! पण केमिकलयुक्त पेस्ट नकोच.
भारतीय संस्कृतीचा गाभा कोणता असे विचारले तर जीवन जगण्याची आदर्श पद्धत हाच आहे. त्यातील कोणतीही पद्धत अभ्यासासाठी घेतली तरी उत्तर हेच येईल. जगात अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि अस्ताला गेल्या. पण एकमेव सहिष्णुतावादी संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती आहे. असे वाक्य आले की, काही जणांच्या कपाळावर आठ्या पडतात. का कोण जाणे पण यात त्यांना राजकारण, भगवेकरण दिसू लागते. संताजी धनाजींची भीती जशी यवनांना निर्माण झालेली, तशी जरब हिंदु संस्कृतीची बसू नये म्हणून कदाचित हा सावध पवित्रा असेल.
पण विश्वामधील एवढ्या आक्रमणानंतर तेवढ्याच ताकदीने आणि सर्व मूल्ये जपत ही हिंदु संस्कृती ताठ मानेने जिवंत आहे आणि तशीच रहाणार. कारण यातील एक एक मूल्य हे चिरंतर सत्यच आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply