नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग अकरा

कराग्रे वसते लक्ष्मी
करमध्ये सरस्वती
करमूले तु गोविंदा
प्रभाते करदर्शनम् ।

सकाळी उठल्यावर सर्वात पहिले आपले तळहात पहावेत.
जे हात कष्ट करून पैसे मिळवणार आहेत, या हातानीच लेखन करून सरस्वतीला प्रसन्न करणार आहोत, तर शत्रूशी लढून स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबातील सर्वांचे संरक्षण करून शांती प्रस्थापित करणारी पार्वती, ह्याच हातामधे विराजमान असते, याची सकाळी सकाळी आठवण करून, नेहेमीच कर्म करायला प्रवृत्त करणारा, हा भक्ती मार्गातील एक ज्ञान पूर्ण श्लोक. फक्त भारतीय संस्कृती मध्येच म्हटला जातो.
आहे ना वैशिष्ट्य ??

लक्ष्मी सरस्वती आणि गोविंदा म्हणजे पार्वती या तिघांनाही वश करून घेणारे हे हात तेवढेच मजबूत हवेत. आणि या हातातील शक्तीवर आपला विश्वास हवा.

आणखी एक श्लोक भूमिवंदना नावाने म्हटला जातो.

समुद्र वसने देवी
पर्वत स्तनमंडले
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं
पादस्पर्शं क्षमस्व मे ।

ज्या भूमीच्या आधारावर आपण उभे आहोत, ज्या भूमीमुळेच माझे सर्व जीवन आहे, त्या भूदेवीला माझा नमस्कार असो. हे पृथ्वी देवते मला तू क्षमा कर ! कारण दररोज सकाळी माझे पाय तुला लागत आहेत.

केवढा विलक्षण कृतज्ञभाव या प्रार्थनेमधे भरलेला आहे. आपले आयुष्य आपले जीवन सुखमय होण्यासाठी ज्यांची ज्यांची मदत होत आहे, त्या सर्व ज्ञात अज्ञात, स्थूल सूक्ष्म, स्थावर जंगम, सजीव निर्जीव वस्तू, व्यक्ती आणि विषय यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे, हे शिकवले जाते फक्त भारतीय संस्कृती मधेच !!!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..