नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग एकवीस

२६. कवल. म्हणजे गाल फुगवून तोंडात पाण्याची चुळ धरून ठेवणे. वेगवेगळ्या औषधी काढ्यांची, तेलाचे कवल अवस्थेनुसार प्रकृतीनुसार गुण दाखवतात, याविषयी लेखन झाले आहे. हा अस्सल भारतीय दैनंदिन उपचार होता. हा उपचार आता केवळ ‘चुळ भरणे’ एवढ्या स्तरावर आला आहे.

२७. गंडूष. हा पण भारतीय विचार. गुळण्या करण्याने अनेक मुख रोग कमी होतात. या विषयी सुद्धा पूर्वी लेखन झाले आहे. आज गुळण्या करणे हे अप्रतिष्ठेचं झालं आहे. एकेकाळी नित्य कर्मामधे याला महत्त्वाचे स्थान होते. आता फक्त चिकित्सा स्वरूप महत्त्वाचे उरले आहे. रोगानुसार, प्रकृतीनुसार हळद मीठ घातलेले कोमट पाणी अथवा काही औषधी काढे अथवा औषधी तेल यांचा वापर एवढ्यापुरत्या या गुळण्या मर्यादीत झाल्या आहेत.

२८. नेत्रस्नान. म्हणजे तोंडात पाणी भरून, डोळे उघडे ठेवून स्वच्छ पाण्याने डोळे धुणे.

हे सर्व प्रकार करताना काय काळजी घ्यावी हे भारतीय शास्त्रात वर्णन करून ठेवलेले आहे. मग ते दात घासणे असो, वा चुळा भरणे, गुळण्या करणे वा नेत्रस्नान.
आजच्या भाषेत “वेल डाॅक्युमेंटेड” आणि कोणी करू नये, हे पण लिहिलेले आहे.
विशिष्ट नक्षत्र, विशिष्ट दिवस, विशिष्ट दिशेचा विचार, विशिष्ट आचार एवढं सगळं का लिहिलं, कसं लिहिलं ?
याचा अर्थ असा आहे, की यावर काही “केस स्टडी” झालेल्या असणार ! आणि अंतिम निष्कर्ष आम्हाला सांगितला गेला.

अगदी निश्चितच!
कारण हे ग्रंथकार ग्रंथात लिहितात,
“इदं आगम सिद्धत्वात अनादित्त्वात च ”
म्हणजे हे आम्ही यापूर्वीच सिद्ध करून ठेवलेले आहे. आता पुनः यावर संशोधन करीत राहू नका. उगाच वेळ, पैसा आणि बुद्धी फुकट जाईल. हितकर हेच आहे की, जसं सिद्ध करून ठेवलंय, तसं वापरायला सुरवात करा.

पण आमच्या मनात किंतु खूप !
“कसं जमणार ?”
“वेळच नाही !”
“हे सर्व आऊटडेटेड झालंय आता !”
“विकसनशील भारतात हे नको आता!”
….
आणि….
हे सर्व आम्ही तोंडात लिस्टराईन माऊथवाॅशची गुळणी धरूनच बोलत असतो.
हीच खरी गंमत आहे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..