२९. कर्णपूरण.
म्हणजे कानात तेल घालणे. फक्त आणि फक्त भारतातच सांगितला जाणारा हा चिकित्सा स्वरूप आणि प्रिव्हेंटीव प्रकारचा एक उपचार.
अन्य पॅथीमधे असे कर्णपूरण इन्फेक्शनच्या नावाखाली निषिध्द मानले आहे. त्याचे ‘रिट्रो इन्स्पेक्शन’ करण्याची तसदी पण कुणी घेत नाहीत.
आमच्या पॅथीमधे नाही म्हणजे नाहीच, असा जो एककल्ली सूर काहीवेळा ऐकायला मिळतो, त्यांच्या कानानाकात तेल घालूनच ते लहानाचे मोठे झालेले आहेत, हे पण सत्य लक्षात घ्यावे. कानाला छिद्र पडले असेल तर मात्र कर्णपूरण करू नये. त्यासाठी जवळच्या वैद्यांना भेटून ते सांगतील ती युक्ती वापरावी. पण उगाचच नको त्या ठिकाणी वाॅटसप महाराजांचे वैद्यकीय सल्ले ऐकायचे नसतात.
३० अंजन घालणे
कानात तेल घालण्याप्रमाणेच अंजन घालणे ही एक भारतीय बहुआयामी नित्यकर्म आहे.
डोळ्यात काजळ घालणे, कानात तेल घालणे, दात दंतमंजनाचा वापर करून बोटांनी घासणे, या अत्यंत उपयुक्त पद्धती आज लुप्त होत चालल्या आहेत. आणि कान नाक घसा दात या अवयवांचे रोग वाढत चालले आहेत, हे सत्य जाणून घ्या. भारतीय शास्त्र बदनाम तर होतेच पण चुकीचे आरोग्य पायंडे पाडून त्यालाच विकास म्हणायची वेळ आणली जात आहे.
या विषयी अधिक सविस्तर माहिती आरोग्यरहस्य भाग एक या पुस्तकामधे आलेलीच आहे.
दातून करणे, कानात तेल घालणे, डोळ्यात अंजन घालणे या शास्त्रीय भारतीय पद्धती होत्या.
बदलत्या काळाचा प्रभाव म्हणा,
मानसिक गुलामगिरी म्हणा,
मध्यंतरीच्या काळात काही आयुर्वेद तज्ञांनी दुर्लक्ष केल्यामुळे म्हणा,
किंवा
झगमगीत जाहीरातींचा प्रभाव म्हणा,
भारतीयत्वापासून आणि आरोग्यापासून आपण लांब जातोय, हे खरे !
आपल्या पुढच्या भारतीय पिढीसाठी एवढे लक्षात ठेवले तरी पुरे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply