६०. देवदर्शनासाठी जायची सुद्धा लाज वाटू लागली. विज्ञान म्हणे देवाला मानत नाही. आपण देवाला मानले तर उगीचच आपणाला आर्थोडाॅक्स म्हटले जाईल, कदाचित याची लाजही वाटू लागली. सगुण आणि निर्गुण या दोन्ही ईश्वराच्या अस्तित्वाचे पक्के सिद्धांत आमच्या संस्कृतीने मान्य केलेले असून देखील देवालयामधे जायची आवश्यकताच नाही, उपासना हे थोतांड आहे, देव भटा ब्राह्मणांनी आपली पोटे भरण्यासाठी केलेल्या संकल्पना आहेत. हे पद्धतशीरपणे रुजवायला सुरवात केली. किती खोटेपणा करावा ?
हिंदु धर्मातील ईश्वर ही संकल्पना मानवतेवरच आधारीत आहे, फक्त समजून घेणे सोपे जावे म्हणून सोळा उपचार निर्मिले.
भक्तीमार्गातून मानवता, कर्म मार्गाने कृतज्ञता आणि संस्कृती संवर्धन किंवा ज्ञानमार्गाने जाऊन जीवनाचे इप्सित साध्य करण्यासाठी साधना आणि सत् चित आनंद प्राप्ती, हे तीन्ही मार्ग जगाला सर्वप्रथम आमच्याच स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते.
हा इतिहास आम्ही विसरत चाललो आहोत. पापामुळे तुमचा जन्म झाला आहे, ही संकल्पना मोडीत काढून तुम्ही अमृताचे पुत्र आहात, सिंहाची शक्ती तुमच्यामधे असून मेंढरासारखे कशाला वागता ? असे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदाना आम्ही विसरत चाललोय.
खरा ईश्वर आपल्यातच असतो, आत्माराम हाच खरा ईश्वर आहे, हे सांगण्यापूर्वी समर्थांनी प्रत्येक गावामधे देवालयांची स्थापना आणि जीर्णोद्धार करून ती शक्ती उपासनेची केंद्र बनवली होती. देव देश आणि धर्म हेच जीवनाचे उद्दीष्ट आहे, हाच मोक्ष आहे, हे ठणकावून सांगणारे कर्ममार्गी समर्थ रामदास याच मातीतले आहेत, याचा आम्हाला विसर पडत चाललाय.
देव ही संकल्पना शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करणारे आमचे संत, हे फक्त टाळकुटे नव्हते. जो जे वांछील तो ते लाहो, हे विश्वची माझे घर, सर्व प्राणी मात्रांचे कल्याण होवो, यात मानवता दिसत नाही काय ?
वेदामधील वर्णन केलेले वरुण, इंद्र, सूर्य, अग्नि हे देव समजून घ्यायला अवघड होऊ लागल्याने काळानुसार बदल होत अवतार ही संकल्पना मांडली गेली, कोटी कोटी रूपे तुझी सांगितली गेली. सर्वांभूती परमेश्वर सांगितला गेला, याचे मूळ शेवटी आपण सारे आतून एकच आहोत, हेच सांगण्यासाठी, मानवता हीच पण ईश्वरसेवा, यासाठी आपण आपल्या भारतीय रुढी परंपरा शास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेतल्या तर ईश्वराबद्दल वाढत चाललेले गैरसमज दूर होतील.
प्रेषित हाच देव एकमेव देव आहे, याशिवाय कोणालाही शरण जायचे नाही, नाहीतर तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही,
या संकल्पनेमधे मानवता आहे का ?
असो.
आपण ईश्वराचे निस्सीम उपासक होतो, आहोत आणि रहाणार. आम्ही चार्वाकाला सुद्धा मान्य केले, यापेक्षा आणखी दुसरी कोणती उदारता दाखवायला हवी ?
चराचरात भरून राहिलेला ईश्वर प्रत्येकाला समजून घ्यायचा अधिकार आमच्या संस्कृतीने प्रत्येकाला दिलेला आहे. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. पण कुठेही विरोध नाही, दंगा नाही, मारामारी नाही. ही आमची संस्कृती होती.
पाश्चात्यांच्या आमच्या संस्कृतीमधील शिरकावामुळे, त्यांनी केलेल्या चुकीच्या प्रबोधनामुळे, तोडा फोडा राज्य करा, वृत्तीमुळे मात्र आमच्या मनोवृत्तीमधे फरक पडत गेला. आकाशातील देव एकच असताना वेगळ्या गणपतीची उपासना कशाला करायला हवी, असे विचारणारी पिढी निर्माण होऊ लागली. आणि मानवतेवर आधारीत असलेली आमची भारतीय विचारांवर आधारीत असलेली ईश्वरीय साधना विसरली जाऊ लागली.
परिणाम दिसतोच आहे. आमच्या मनाची स्थिरता, शांती, इ. धारणा कमी होत गेल्या. पाश्चात्य देशाप्रमाणे आमच्याही देशात मनोविकृती वाढत चालल्या, आत्मदोषजन्य व्याधी वाढत चालले, सत्व रज तम याचे असंतुलन होऊ लागले. आणि शरीराबरोबरच मन, आत्मा, इंद्रिय दुष्टीजन्य आजार वाढून, कायम स्वरूपी औषध योजना सुरू झाली.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply