आपल्या लक्षात येतंय का ?
आपण काय काय भारतीयत्व गमावलंय ते !
१. ब्राह्म मुहुर्तावर उठणे विसरलो आणि उशीरा उठायला सुरवात केली.
२. रात्री लवकर झोपायची आपली परंपरा सोडून जागरणाच्या नादी लागलो
३.प्रत्येकाचे अंथरुण वेगळे असावे
४.दात घासण्याचे दंतमंजन विसरलो आणि रासायनिक टूथपेस्टने फेस काढायला लागलो.
५.दात घासायची काडी विसरून, प्लॅस्टीकचा टूथब्रश तोंडात फिरवायला लागलो.
६.घट्ट बिछाना आणि लाकडी खुर्ची सोडून मऊ मऊ फोमच्या गाद्यांनी कंबरदुखी, पाठदुखी वाढवू लागलो.
७. गोधडीतील ऊब विरून गेली, आणि बाळंतपणच संपवून टाकल्याने मायेनं शिवलेली दुपटी देखील विसरून गेली.
आणि
८. कृत्रिमरीत्या तयार केलेल्या पांघरूणातील तंतूनी दमा आणि अॅलर्जी मात्र वाढू लागली.
खरं आहे हे !
आज जी विकतची काही मऊ मऊ पांघरुणे मिळतात, त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेली फर वापरली जाते. त्यात जे रंग डाय करण्यासाठी वापरले जातात, ते पण अॅलर्जी वाढवतात, असे लक्षात येत आहे. सहज हातात धरून झटकली तरी ही फर वाऱ्यावर उडताना नुसत्या उघड्या डोळ्यांना दिसते.
हीच फर आपल्या सोबत वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतु साठवून ठेवते.
बरं ही कृत्रिम पांघरुणे धुताही येत नाहीत. ती एवढी जाड आणि जड असतात, की वाॅशिंग मशीनमधेही जात नाहीत. हातानी धुवायला आता झेपत नाहीत. आटापिटा करून धुतली तरी त्यातला साबण काही जात जात नाही. साबणही घालवला तरी वाळवायला जागाच नाही. आता झाली पंचाईत.
….मग आहेत तशीच वापरायची आणि ती अनवाॅशेबल आहेत म्हणून मिरवायची.
जीन्स पॅन्टी सारखी !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply