नवीन लेखन...

आजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस

६६ भारतीय आहारामधे सहा चवी हव्यात. पण आज मधुमेह झाला म्हणून गोड बंद, पित्त वाढते म्हणून तिखट आंबट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, राहिली एक तुरट चव. पाश्चिमात्य आहाराविषयी न बोललेलंच बरं.

मला आश्चर्य वाटतं. एक भारतीय म्हणून मी जेव्हा अभिमान वाटावा अशा गोष्टीचा विचार करतो तेंव्हा काही वाचकांना आपण भारतीय म्हणून का जन्माला आलो, इथपासून भारतातील प्रत्येक गोष्ट चुकीची कशी हे पटवण्याचा जोर चढतो. भारतीय असण्याचा अभिमान सोडाच, भारतीय बनण्यासाठी एक पाऊल पुढे उचलायची तयारी पण असत नाही, एवढे पाश्चात्य विचारांचे आम्ही गुलाम झालो आहोत.

आमटी भाजीतली शिजलेली शेवग्याची शेंग एक भारतीय कसा खाईल ? दोन करंगळी आणि तर्जनी यांच्या मधे हा शेंगेचा तुकडा घट्ट धरून कौशल्याने अंगठ्याने गर काढून खाणे जेवढ्या सहजतेने आपणाला जमेल ते पाश्चिमात्य माणसाला जमेल का ? ज्या भारतीयांना ते जमणार नाही, तो सरळ ती शेंग तोंडात घालून चावून चावून रस गिळून चोथा करूनच बाहेर काढील.

भारतीय म्हणून या दोन्ही पद्धती योग्यच आहेत. झाकणाला लागलेले आईस्क्रीम खाण्यासाठी ते चाटून खाण्यापर्यंत आमची मजल नक्कीच जाईल, पण झाकणाला लागलेले आईस्क्रीम मिळविण्यासाठी झाकणच तोंडात घालून खाणे, एवढा असंस्कृतपणा भारतीयांमधे नक्कीच नाही. ( म्हणजे पाश्चिमात्यांकडे तो आहे असंही मला म्हणायचं नाही. ??)

तसंच एक चायनीज माणूस त्यांच्या नूडल्स दोन स्टीकने दोन बोटानी जितक्या सहजपणे खाईल तेवढा सहजपणा आपल्याला जमणे शक्यच नाही. हे सत्यच आहे.

भगवान बुद्ध म्हणतात, Train your mind to see good in everything. Happpiness of your life depends on the quality of your thoughts.
एक भारतीय म्हणून जे जे चांगलं आहे ते ते सर्वांकडून शोधून शोधून घ्यावं. पण शोधून शोधून नकारात्मक भाव मनात निर्माण करून घेण्याला काय म्हणावं ?

आहाराचे सुसंस्कृत शास्त्र भारतीयांना जेवढे माहिती असेल ते आणखी माहित करून घेणे आणि सुसंस्कृतपणा वाढवणे यात शहाणपणा नाही काय ?

भारतमाता ही एका उत्तम संस्कृतीची जननी आहे. तशीच आहारशास्त्राची, आयुर्वेदाची, अध्यात्मशास्त्राची, कृषीशास्त्राची, अर्थशास्त्राची, व्यवस्थापन शास्त्राची जननी आहे. किती सुपुत्रांना तिने जन्म दिलाय, आणखी किती सुपुत्र आमच्या दृष्टी आड गेलेत, ते ही आपण बघणारच आहोत. तिचे उपकार फेडण्यासाठीच हा जन्म आपल्याला मिळालाय.

वेळ कमी उरलाय. जवळपास अर्धे आयुष्य संपले आहे. सकारात्मक भाव ठेवला तर उर्वरीत प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी तशी सकारात्मक होण्यासाठी आपणच बदलले पाहिजे. थोडे सकारात्मक झाले पाहिजे.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..