जयदेव जयदेव जय ओजस बाळा,
आरती तव, करिती प्रेमें, आजी-आजोबा,
जयदेव जयदेव ।
हसुनि हसुनि गालीं, लाविसी तूं लळा,
विसर न हपणे लीलांचा, आम्हां गोपाळा,
जयदेव जयदेव ।।धृ।।
सुखकर्ता दु:खहर्ता, मूर्ती हर्षाची,
न ओळी तू औषध, कृपा व्हावी देवाची ।
शोभातनु वरी तव, विलसे सुंदर ड्रेसांची,
करुं नकोस ती, ओकुनि माती-मोलाची ।।
जयदेव जयदेव ।।१।।
मुकुट शोभे, शिरी तो, कुरळ्या केसांचा,
लागला ध्यास, तव सुहास्य-वदनाचा ।
लेवुनि अंगी, सुरेल, ड्रेस, तो अमेरिकेचा,
सजला बाळ अमुचा, भारत-वर्षाचा ।।
जयदेव जयदेव ।।२।।
आहेस तूचि, कंठ-मणी, आई-बापांचा,
तसाच तूं, लाडका, होईल सकलांचा ।
बनुनि नट-खट, व्हावा प्यारा सकलांचा,
दासगुरु वदे, लाभला, ठेवा सौख्याचा ।।
जयदेव जयदेव ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१० जुलै २००८
फिनिक्स, अरिझोना, यु.एस. ए.
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply