लोचनात, माझिया
तुझी ती निरागसता
डोळेच तुझे बोलती
तुलाच आठविताना.
तुझ्याच अस्तित्वाचे
भास आज जगताना
सर्वत्र तुझ्याच खुणा
जोजविती स्पंदनांना.
दुरत्वाचेच दुःख अंतरी
समजाविते आसवांना
अव्यक्त भाव निरागस
स्वप्नी तुलाच पाहताना
तू असावेस या जीवनी
साराच जन्म भोगताना
ही आंस मनांतरी होती
पण काय झाले कळेना
वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544906
रचना क्र. १०२.
४ – ४ – २०२२.
Leave a Reply