ती दिसती दूर अंधुक छायेसी मूर्ती
अतिरम्य पण मज ती दिव्य प्रतिमा गमती
ते गंभीर”स्थित”वितरीतसे कृष्णकांती
मनोहर दृश्य ते निम चांदण्या राती
न नाव कुठले,गाव,नाही माहित कुठली जाती
न दिसते त्या जाणिवांच भाव म्हणुनी राहती
तिजपाहुनी असे वाटते आहेत गतजन्माची नाती
मज भेटाया आलेली ती भूतकुळातील व्यक्ती
असेल वा तो कोणी परलोकीचा देवदूत
जो घेऊनि आला नक्षत्रांची शिदोरी निजबाहुत
जो आहेस कोण तू, अंधकार हा उजळून दे
ये मानव्याच्या लेकरा मज “माणुसपणाचे” गुण दे
-महेश सुर्यवंशी(कागल)