आसाम भारताचे अविभाज्य घटकराज्य, परंतु परकीय शक्तींच्या अनावश्यक हस्तक्षेपाने आज अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कित्येक वर्षापासून हिंसाचार आणि नरसंहाराच्या समस्येने आसाम धगधगत असल्याने स्थानिक लोकांचे जीवन असह्य झाले आहे. बांग्लादेशी मुस्लीम घुसखोर, आणि मूळ निवासी जनजातीय बोडो बांधवांमध्ये ही पहिली दंगल नाही. १९९३, १९९४, १९९६, २००८ आणि २०१२ मध्ये दंगल भडकली. ही एक राष्ट्रीय समस्या बनत चालली आहे, विशेषतः बोडो बहुल प्रांतात, परकीय बांग्लादेशी मुस्लीम घुसखोरांचे नेहमी होणारे हल्ले आणि राज्य तसेच केंद्र सरकारांतील समन्वयाचा अभाव यामुळे समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. बांग्लादेशी घुसखोरीकडे, आसाम विध्यार्थी संघटनेने सर्वप्रथम लक्ष वेधले होते, ते संकट आता नाकातोंडाशी आले आहे.
कोकराझार, चिरांग, उदालगुडी आणि बक्सा या बोडो बहुल प्रांतांमध्ये उफाळलेला हिंसाचार हे बांग्लादेशी घुसखोर मुस्लिमांचे घृणित कृत्य आहे. ३८ बोडो लोकांचा नरसंहार तसेच एक लाखांवर लोकांना शरणार्थी शिबिरांमध्ये घ्यावा लागलेला आश्रय, ही बाब निश्चितच बांगलादेशी घुसखोरांच्या अत्याचारांची दाहकता दर्शविते. ओंताईबाडी व गोसाईगाव येथील बोडो बांधवांच्या आस्थेचे प्रतिक असलेल्या ब्रम्हा मंदिराला जाणूनबुजून लावलेली आग, हे एक षडयंत्र होते. बोडो बांधवांच्या उद्रेकाला कारणीभूत ठरतील असे प्रकार वारंवार केले जात आहेत. बोडो विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला लावलेली आग, राजधानी एक्सप्रेस वरील हल्ला हे पूर्वनियोजित षडयंत्राचाच भाग आहे.
बोडो बांधवांची हत्या, लुट, बोडो तरुणींचे अपहरण, जबरदस्तीने धर्मांतरण तसेच बोडो मूळ निवासी जनजातीय लोकांच्या जमिनीवरील अतिक्रमण हे प्रकार दररोजचेच झालेले आहेत. क्रुरतेने अत्याचार करणे आणि पुन्हा बोडो बांधवांवर खोटे आरोप करून त्यांनाच वेठीस धरणे ही बाब सर्वश्रुतच आहे. दोन वर्षापूर्वी हावरियापेठ गावातील काली मंदिर परिसरात मुत्रीघर बांधण्याचा प्रयत्न झाला होता, आणि त्यातून वाढलेल्या तणावाचे खापर बोडो बांधवांवर फोडण्याचा प्रयत्न झाला.
आसाममधील ४२ विधानसभा क्षेत्रांतील बांग्लादेशी मुस्लीम घुसखोरांचे बाहुल्य, ब्रम्हपुत्रेच्या पुत्रांना अभिशाप ठरत आहे. नैसर्गिक संकटांना तोंड देत जगणाऱ्या, जनजातीय बोडो बांधवांच्या अल्पशिक्षितपणाचा फायदा घेऊन अधिकच अत्याचार केले जातात. या बाबीकडे विद्यमान राज्यसभा सदस्य तरुण विजय यांनी विशेषत्वाने लक्ष वेधले. भारतीय संस्कृतीवर अगाढ निष्ठा असलेल्या या बांधवांना आम्ही सुरक्षिततेचे वातावरण कधी देणार ? बांग्लादेशी घुसखोरांना कधी हुसकावून लावणार आणि भारताच्या सुरक्षेला मजबूत करणार ? ह्या समस्येचे स्वरूप नुसते दंगलीपुरते मर्यादित नसून, भारताच्या विरोधात योजनाबध्दरित्या परकीय शक्तींनी पुकारलेले युद्ध आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply