नवीन लेखन...

आस्तित्व

जगण्या-मरण्याच्या पोकळीमध्ये जे दोन-चार क्षण आपल्या वाटयाला येतात त्याला आपण आयुष्य असं म्हणत असतो. पण कधी-कधी या आयुष्याची निरर्थकता स्पष्टपणे जाणवायला लागते. ‘We are thrown into the world’ या हायडेगरच्या वाक्याची सार्थकता जाणवायला लागते. कशासाठी खेळायचा हा खेळ? कशासाठी जगायचं? आई-वडिलांसाठी? बायकोसाठी? मुलांसाठी? देशासाठी? समाजासाठी? पण आई-वडिलांनी तरी का जगावं? मुलाने तरी का जगावे? देश तरी का असावा? समाज तरी का असावा? सगळेच नसले तर कुणाला काहीच फरक पडण्याचे कारण नाही. कारण फरक पडण्यासाठी कुणी असणारच नाही.

पण असं असलं, तरी ‘मी नसावं’ असं कधीच मला वाटत नाही. येनकेन प्रकारे ‘मी’ माझं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण एकटा ‘मी’ असून भागत नाही. या अवाढव्य पसरलेल्या पृथ्वीवर ‘मी’ एकटा काय करणार? माझ्या सारखचं कुणीतरी माझ्या सोबतीला असायला हवं, नाहीतर ‘मी’ एकटा पडेन. एकट्या ‘मी’ला संपून जाण्याची खूप मोठी भीती असते. पण दुसऱ्या कुणाचे तरी असणं एवढच ‘मी’च्या जगण्यासाठी पर्याप्त नसतं. त्या ‘दुसऱ्या’शी ‘मी’ चे भावनिक नाते असायला हवे. तसे नसेल तर दुसऱ्याच्या असण्याचा ‘मी’ला काहीच लाभ नाही. त्याचा एकटेपणा आणि असुरक्षितता जाणार नाही. म्हणून ‘मी’चं इतरांशी भावनिकरित्या जोडलेलं असणं महत्वाचं असतं. त्या शिवाय ‘मी’ला आनंदानं जगता येणे शक्य नाही. आनंदानं जगण्यासाठी ‘मी’नं कुणावर तरी जीवापाड प्रेम करणं गरजेचं असतं. दुसरं कुणीतरी ‘मी’ वर जीवापाड प्रेम करत असेल तर मग ‘मी’च आयुष्य आनंदाचा उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही.

no man is an island. आपण सगळे एकमेकांना पूरक आहोत. एकमेकांच्या खांदयावर उभे राहून आपण उत्क्रांतीचा वेध घेण्याचा प्रयत्न करत असतो. इथे मुक्ती असली तरी ती सामुहिक आहे. एकट्या ‘मी’ला इथे मुक्ती नाही.

— संदीप घडमोडे यांचा फेसबुकवरील लेख

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..